हरवलेलं आधार कार्ड एका मेसेजवर लॉक करा

| Updated on: Oct 07, 2019 | 9:02 PM

कार्ड हरवल्यानंतर त्याचा गैरवापर होण्याचाही धोका असतो, शिवाय डेटा लीकही होऊ शकतो. पण यावर मात करण्यासाठी यूआयडीएआयने एक खास फीचर (Aadhar Card lock) आणलंय, ज्यामुळे तुम्ही आधार नंबर लॉक किंवा अनलॉक (Aadhar Card lock) करु शकता.

हरवलेलं आधार कार्ड एका मेसेजवर लॉक करा
आधार कार्डवरील पत्ता किंवा जन्मतारीख चुकीची आहे? या कागदपत्रांद्वारे करा अपडेट
Follow us on

मुंबई : आधार कार्डचा वापर सध्या शासकीय योजना, बँक खातं ते अगदी सिम कार्ड घेण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा बनलाय. आधार कार्डमध्ये तुमच्या बायोमेट्रिक्सपासून अत्यंत महत्त्वाची माहिती असते. पण हे कार्ड हरवल्यानंतर त्याचा गैरवापर होण्याचाही धोका असतो, शिवाय डेटा लीकही होऊ शकतो. पण यावर मात करण्यासाठी यूआयडीएआयने एक खास फीचर (Aadhar Card lock) आणलंय, ज्यामुळे तुम्ही आधार नंबर लॉक किंवा अनलॉक (Aadhar Card lock) करु शकता.

सुरक्षेच्या दृष्टीने यूआयडीएआयने आतापर्यंत अनेक महत्त्वाची पाऊलं उचलली आहेत. पण या फीचरमुळे तुमचा डेटा सुरक्षित राहिल. सोबतच आधार कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनाही टाळता येतील. हे फीचर एका लॉकरसारखं असेल, जे फक्त आणि फक्त आधार कार्ड धारकालाच वापरता येईल.

आधार कार्ड हॅक करण्याचाही धोका या फीचरमुळे टाळता येणार आहे. तुमच्या परवानगीशिवाय कुणीही आधार व्हेरिफिकेशन करु शकणार नाही. कारण, व्हेरिफिकेशनसाठी ओटीपी पाठवला जाईल, जो तुमच्या मोबाईल क्रमांकावर येईल.

आधार लॉक कसं कराल?

आधार नंबर लॉक करण्यासाठी कार्ड धारकाला 1947 या क्रमांकावर GETOTP लिहून मेसेज पाठवावा लागेल. यानंतर तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर ओटीपी (One Time Password) येईल.

ओटीपी मिळाल्यानंतर कार्डधारकाला LOCKUID आणि पुढे आधार नंबर लिहून पुन्हा एकदा 1947 या क्रमांकावर मेसेज पाठवावा लागेल. यानंतर आपोआप तुमचा आधार नंबर लॉक होईल.

आधार अनलॉक कसं कराल?

आधार नंबर लॉक केल्यानंतर मेसेजवरच तुम्ही नंबर अनलॉकही करु शकता. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरुन GETOTP लिहून 1947 वर मेसेज पाठवा. यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक व्हेरिफाय होईल.

मोबाईल व्हेरिफाय केल्यानंतर UNLOCKUID आणि पुढे आधार नंबर, ओटीपी लिहून पुन्हा 1947 वर मेसेज पाठवा. आपोआप तुमचा आधार क्रमांक अनलॉक होईल.