Tech News : फोन हरवला तरी डेटा सुरक्षित राहील; या 8 सेटिंग्स आजच सुरू करा
आज स्मार्टफोनमध्ये फोटो, वैयक्तिक कागदपत्रे, ईमेल, सोशल मीडिया आणि आर्थिक अॅप्सची माहिती असते. त्यामुळे फोन हरवल्यास केवळ डिव्हाइसच नाही, तर वैयक्तिक आणि आर्थिक माहितीही धोक्यात येऊ शकते. फोन चोरीला गेल्यानंतर उपाय करण्यापेक्षा आधीच सुरक्षा सेटिंग्स सुरू करून ठेवणे अधिक उपयोगी ठरू शकते

आजच्या काळात फोन चोरीला जाणे म्हणजे सर्वस्व चोरीला जाण्यासारखे आहे. एकवेळ स्वत: गायब झालो तरी चालेल पण फोन गायब झाला की मन सैरभैर होते. कारण आजच्या काळात स्मार्टफोन म्हणजे फक्त कॉलिंग किंवा मेसेजिंगच साधन राहीलेल नाही. फोनमध्येआपले फोटो, व्हिडिओ, वैयक्तिक कागदपत्रं, ईमेल, सोशल मिडिया अकाउंट्स याशिवाय आता UPI ची माहिती देखील असते. त्यामुळे फोन हरवला किंवा चोरीला गेला तर आर्थिक नुकसान तर होतंच त्याशिवाय वैयक्तिक माहितीही चुकीच्या हाती जाण्याची भीती असते.
1. Find my device ON ठेवा
Android फोनमध्ये nd my device ON किंवा find hub आणि iPhone मध्ये find my फीचर सुरू ठेवा. फोन हरवल्यास या फीचरच्या मदतीने त्याचं लोकेशन पाहता येतं. गरज पडल्यास फोन लॉक करता येतो आणि काही परिस्थितीत डिव्हाईसमधील डेटा रिमोटली डिलिट करण्याचाही पर्याय मिळतो.
2 . मजबूत PIN किंवा Screen Lock वापरा
फोनला सहज ओळखता येईल असा PIN ठेवणं टाळा. त्याऐवजी मजबूत पासकोडसोबत Fingerprint किंवा face Unlock वापरा. यामुळे फोन हरवल्यानंतर त्यातील वैयक्तिक माहितीपर्यंत थेट पोहोचणं कठीण होऊ शकतं.
3. Android Remote Lock सूरू करा
Android मध्ये Remote Lock हे फिचरही उपयोगी ठरतं. फोन हरवल्यानंतर दुसऱ्या डिव्हाइसच्या मदतीने तो रिमोटली लॉक करता येतो. हे फिचर settings मधील google – all services – theft protection – remote lock या पर्यायातून सुरू करता येतं.
4. theft protection ON ठेवा
काही Android फोनमध्ये theft protection अंतर्गत theft detection lock आणि इतर सुरक्षा फीचर्स मिळतात. फोन हिसकावून घेऊन पळण्यासाठी परिस्थिती ओळखल्यास काही डिव्हाइसेस आपोआप स्क्रिन लॉक करू शकतात.मात्र हे फिचर फोनच्या मॉडेल आणि सॉफ्टवेअर अवलंबून असू शकतं.
5. lock screen वर notification लपवा
फोन लॉक असतानाही WhatsApp मेसेज, ईमेल किंवा इतर नोटिफिकेशन मजकूर स्क्रिनवर दिसत असेल तर वैयक्तिक माहिती उघड होऊ शकते. त्यामुळे lock screen वर नोटिफिकेशनची पूर्ण माहिती दिसणार नाही.अशी सेटिंग ठेवणं सुरक्षित ठरू शकतं.
6. Banking आणि UPI Apps ना अतिरिक्त सुरक्षा
फोनमध्ये बँकिग, UPI किंवा डिजिटल वॉलेट अॅप्स असतील तर त्यांना fingerprint किंवा face id सारखा वेगळा लॉक लावा. त्यामुळे फक्त फोनचा screen lock उघडला म्हणून आर्थिक अॅप्स सहज वापरणं शक्य होणार नाही.
7. फोनचा backup सुरू ठेवा
फोन चोरीला गेल्यावर पैशांमध्ये फोटो, व्हिडिओ आणि महत्त्वाच्या फाईल्स गमावल्याचं दु:ख अनेकदा जास्त होतं. त्यामुळे google backup किंवा icloud backup सुरू ठेवा. यामुळे फोन हरवल्यानंतरही आधीच डेटा दुसऱ्या डिव्हाईसवर मिळवण्यास मदत होऊ शकते.
8. IMEI नंबर सुरक्षित ठेवा
प्रत्येक मोबाईलचा वेगळा IMEI नंबर असतो. फोन चोरीला गेल्यास पोलिंसात तक्रार करताना किंवा डिव्हाईसशी संबंधित प्रक्रियेत हा नंबर उपयोगी ठरू शकतो. त्यामुळे IMEI नंबर फक्त फोनमध्ये सेव्ह करून न ठेवता तो वेगळ्या ठिकाणी लिहून ठेवा. फोनच्या बॉक्सवरही तुम्हाला हा नंबर मिळू शकतो.