2020 मधील ISROची पहिली मोहीम, शत्रूराष्ट्रांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या ‘EOS-01’उपग्रहाचं 7 नोव्हेंबरला प्रक्षेपण

| Updated on: Oct 29, 2020 | 3:19 PM

ISROचा यावर्षीचा पहिला उपग्रह नोव्हेंबरमध्ये आकाशात झेपावणार आहे. 7 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून या उपग्रहाचं प्रक्षेपण होणार आहे.

2020 मधील ISROची पहिली मोहीम, शत्रूराष्ट्रांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या EOS-01उपग्रहाचं  7 नोव्हेंबरला प्रक्षेपण
Follow us on

नवी दिल्ली: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात ISROचा यावर्षीचा पहिला उपग्रह नोव्हेंबरमध्ये आकाशात झेपावणार आहे. 7 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून या उपग्रहाचं प्रक्षेपण होणार आहे. ISROकडून बुधवारी यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. (‘EOS 01’ Satellite To Be Launched On November 7, This Will Be ISRO ‘s First Mission Of 2020)

ISRO ने दिलेल्या माहितीनुसार उपग्रह ‘EOS-01′(अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट)चं PSLV-C49 या रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपण केलं जाणार आहे. यासोबतच 9 कस्टमर उपग्रहांचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. हे सर्व उपग्रह न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्या एकत्रित करारानुसार प्रक्षेपित केले जाणार आहेत.

‘EOS-01’अर्थ ऑब्झर्वेशन रिसेट सॅटेलाईटचं एक आधुनिक प्रकार आहे. याच्या सिंथेटिक अॅपर्चर (SAR)रडारमध्ये कुठल्याही वेळेत आणि कोणत्याही वातावरणात पृथ्वीवर नजर ठेवण्याची क्षमता आहे. हा उपग्रह ढगाळ वातावरणातही पृथ्वीवर नजर ठेवू शकतो.

या उपग्रहामुळे भारतीय सैन्याला मोठी मदत होईल. या उपग्रहाच्या सहाय्याने चीनसह सर्वच शत्रू राष्ट्रांवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. यासोबत शेती, जंगल आणि पूरसदृश्य स्थितीवरही लक्ष ठेवता येणार आहे.

PSLV-C50 लॉन्च करण्याची ISROची तयारी

ISRO डिसेंबरमध्ये GSAT-12R हा कम्युनिकेशन उपग्रह PSLV-C50 च्या सहाय्याने प्रक्षेपित करण्याची योजना आखत आहे. ISRO ने यापूर्वी 11 डिसेंबर 2019 ला रिसॅट-2BR1चं प्रक्षेपण केलं होतं. हा उपग्रह PSLV-C48 या रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात पाठवण्यात आला होता.

खासगी कंपन्याही अवकाशात सॅटेलाईट पाठवू शकणार

भविष्यात देशातील खासगी कंपन्यांनाही अवकाशात स्वत:चा उपग्रह (satellites) पाठवण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. या सॅटेलाईट लहरींच्या माध्यमातून भारतीय कंपन्यांना परदेशातही सेवा पुरवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. अंतराळ विभागाने ( DoS) मोदी सरकारकडे यासंदर्भातील प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे देशांतर्गत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणारे मोदी सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मोदी सरकारने हा प्रस्ताव मान्य केल्यास खासगी कंपन्यांना केंद्राच्या नव्या अंतराळ धोरणानुसार अवकाशात सॅटेलाईट पाठवण्याची मुभा मिळेल. या कंपन्या सॅटेलाईटसच्या नियंत्रणासाठी परदेशात कंट्रोल रूम उभारू शकतात. तसेच या धोरणातंर्गत भारतीय कंपन्यांना स्वतंत्रपणे परदेशी सॅटेलाईटसची सेवाही घेता येईल.

संबंधित बातम्या:

खासगी कंपन्याही अवकाशात सॅटेलाईट पाठवू शकणार; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

चंद्रयान 2 मधील दोन्ही रोव्हरचा शोध लागला, एकाने जागा बदलली, NASA चे फोटो ट्विट करत तंत्रज्ञाचा दावा

‘EOS 01’ Satellite To Be Launched On November 7, This Will Be ISRO ‘s First Mission Of 2020