Meta One Plan : इंन्स्टाग्राम , व्हॉट्सअॅप वापरायला भरावे लागणार पैसे? मेटाने आणलेल्या नव्या मेटा वन प्लॅनमध्ये नेमकं काय? वाचा…
सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांसाठी META ONE हे नवे फिचर लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रिल्स बनवताना, कंटेट क्रिएट करताना, फॉलोवर्सपर्यंत पोहोचणे अधिक सोप्पे होणार आहे.

इंन्स्टाग्रामवर रिल्स स्क्रोल करता करता वेळ तासनतास निघून जातात, तर व्हॉट्सअॅपवर दिवसभर चॅटिंग सुरूच असते. सोशल मीडीयावर अॅक्टिव राहायच असेल किंवा ट्रेंड फॉलो करायचे असतील तर व्हॉट्सअॅप आणि इन्टाग्रामशिवाय पर्याय नसतो. पण मेटाने या सोशल मीडियाच्या दुनियेत एक नवा ट्विस्ट आणला आहे. मेटाने नुकतंच META ONE नावाचं सबस्क्रिप्शन सुरू केल आहे. त्यामुळे WHATSAPP आणि INSTAGRAM वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार कि काय असा प्रश्न पडला आहे.
सोशल मिडिया वापरण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार
सबस्क्रिप्शन आलं तर डोक्यात थेट विचार येतो तो किती पैसे द्यावे लागणार? तर याच उत्तर नाही अस नाही. सामान्यासांठी INSTAGRAM, FACEBOOK, WHATSAPP आणि META AI चा वापर मोफतच राहणार आहे. त्यामुळे सोशल मिडिया अॅप वापरणं बंद करण्याची काही गरज नाही. ज्यांनी META ONE हे खास फिचर वापरायचे आहे त्यांच्यासाठीच सबस्क्रिप्शन लागू करण्यात आले आहे.
META ONE मुळे मिळाणार रिल्सना AI चा टच
META ONE या फिचरमुळे रिल्स किंवा कंटेटना AI चा टच मिळणार आहे. फोटो तयार करण्यापासून ते व्हिडिओ एडिटिंग पर्यंत आणि कंटेट तयार करण्यापासून ते सोशल मिडिया मॅनेजमेंटपर्यंत AI चा टच देता येणार आहे. यामध्ये AI पासून सोशल मिडिया कस्टमायझेशनपर्यंत ५० एक्स्ट्रा फिचर्स मिळणार आहेत.
INSTAGRAM. FACEBOOK आणि WHATSAPP लाही मिळणार PLUS ट्रिटंमेंट
META ONE च्या काही प्लॅन्समध्ये INSTAGRAM साठी एक्स्ट्रा फिचर्स मिळणार आहेत. STORY आणि DM शी संबंधित सुविधा, तसेच FACEBOOK आणि WHATSAPP साठीही थीम करण्यापासून आणि आयकॉन बदलण्यापर्यंत काही अतिरिक्त पर्याय मिळतील, तसेच FACEBOOK मध्येही कस्टमायझेशन आणि रिल्स संबंधित अतिरिक्त सुविधा मिळणार आहेत.
CONTENT CREATORS साठी फायदा
CONTENT CREATORS असाल किंवा सोशल मीडियावर व्यवसाय करत असाल तर META ONE मध्ये काही प्रोफेशनल फिचर्सही मिळणार आहेत. जसे RECYCLE TOOL, VOICE EFFCETS, AI BACKGROUNDS. याशिवाय VERIFIED BADGE, बनावट अकाउंटपासून संरक्षण, बोल्ड फॉलो बटण, फॉलोवर्सपर्यंत लगेच पोहोचण्यासाठी META AGENTS, महिनाभर आधीपासून स्टोरी शेड्यूलिंग, यांसारखे अनेक फायदे मिळणार आहेत.
किती पैसे मोजावे लागणार?
साधारण युजर्ससाठी प्रीमीयम प्लॅन ७६६ प्रति महिना असणार आहे. तसेच प्रोफेशनल क्रिएटर तसेच बिझनेस अकाउंटसाठी सुरूवातीचे प्लॅन १४३७ प्रति महिना आहे.याशिवाय अॅडवान्स प्लॅन हवा असेल तर ४७९४ रू. इतका आहे. याशिवाय मोठ्या ब्रँड्ससाठी हिच किमत प्रति महिना १४,२९० रूपये ते ४७,८६० रुपये इतकी आहे.