Ambani Jio – Elon Musk : Jio ला टक्कर देऊन भारतात लाँन्च होण्यासाठी स्टारलिंक फुल रेडी, किती असेल रिचार्च पॅकची किंमत?
Airtel , BSNL, VI, Jio या रिचार्जसोबतच आता लवकरच स्टारलिंक भारतात येणार आहे. अंबानीची रिलायन्स कंपनी देखील अशीच सेवा भारतात सुरू करण्याच्या तयारीत आहे. पण मग कोण बाजी मारणार? एलॉन मस्क कि अंबानीच रिलायन्स? आणि याचा ग्राहाकांच्या रिचार्जवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

घरात wifi लावायचं म्हटलं की आधी इंटरनेटची केबल राऊटर आणि कनेक्शनचा सगळा हिशोब करावा लागतो. पण आता इंटरनेट थेट अवकाशातून घरात येणार आहे. होय सॅटेलाईट आता तुमच्या फोनचा रिचार्ज करणार आहे. भारतात हि सेवा सुरू करण्यासाठी रिलायन्स जिओ आणि एलॉन मस्क यांची स्टारलिंक कंपनी काम करत आहे.
त्यामुळे या दोघांपैकी कोणाची सेवा लवकर सुरू होणार, ग्राहकांना रिचार्जसाठी किती पैसे मोजावे लागणार?
सॅटेलाईट इंटरनेट म्हणजे नेमकं काय?
आतापर्यंत आपण मोबाईल टॉवर किंवा फायबर केबलच्या मदतीने इंटरनेट वापरतो. सॅटेलाईट इंटरनेटमध्ये मात्र स्पेसमध्ये असलेल्या उपग्रहांकडून सिग्नल पाठवले जातात. घराच्या छतावर बसवलेलं विशेष अँटेना किंवा टर्मिनल हे सिंग्नल स्वीकारत आणि राऊटरच्या मदतीने घरात इंटरनेट मिळतं.
याचा सर्वाधिक फायदा डोंगराळ भाग, दुर्गम गावं, बॉर्डरवरचे प्रदेश आणि जिथे फायबर केबल पोहोचवणं कठीण आहे अशा प्रदेशात याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. नैसर्गिक आपत्तीमुळे जमिनीवरील नेटवर्कचं नुकसान झालं. तरी पर्यायी इंटरनेट उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही सेवा उपयोगी ठरू शकते.
Jio स्वस्त इंटरनेट देणार की स्टारलिंक बाजी मारणार ?
Jio भारतात स्वस्त मोबाईल प्लॅन डेटासाठी ओळखलं जातं त्यामुळे सॅटेलाईट सेवा दिल्यावर या किमतीत फरक होणार का? ग्राहकांना तो रिचार्ज परवडणार का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
केव्हा पर्यंत सेवा सुरू होणार?
Jio , Starlink, Oneweb या कंपन्याना भारतात सॅटेलाईट संप्रेषण सेवा देण्यासाठी परवाने मिळाले आहेत. मात्र व्यावसायिक सेवा सुरू करण्यासाठी स्पेक्टम आणि आवश्यक सुरक्षा व नियामक मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहे.
थोडक्यात काय तर अंबानीचा Jio आणि एलॉन मस्कची Starlink यांच्यात काटे कि टक्कर पाहायला मिळणार आहे. कोण पहिलं बाजी मारत? आणि कोणाला किती नुकसान होतं ? कोण ग्राहकांना स्वस्त रिचार्ज देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अमेरिकेतील शिकागोमध्ये Starlink च्या एका घरगुती प्लॅनची सुरूवात महिन्याला 55 डॉलर म्हणजे अंदाजे 5,222 रूपये आहे. या प्लॅनमध्ये 100 MBBS पर्यंत इंटरनेट वेग दिला जातो.पण सध्या भारताता Jio किंवा Starlink ने सॅटेलाईट इंटरनेटचे अधिकृत रिचार्जची किंमत जाहीर केलेली नाही. त्यामुळे भारतात ही सेवा नेमकी किती रूपयांपासून सूरू होईल. हे अजून जाहीर झालेले नाही.