50MP कॅमेरासह Oppo Reno 7, Reno 7 Pro लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

| Updated on: Nov 02, 2021 | 7:30 AM

ओप्पो रेनो 7 (Oppo Reno 7) सिरीजचं लाँचिंग जवळ आलं आहे. नुकतेच या आगामी स्मार्टफोनची किंमत, डिझाइन आणि फीचर्स लीक झाले आहेत. त्याची चार्जिंग क्षमता चीनच्या 3C सर्टिफिकेशन साइटवर नोंदवली गेली आहे.

50MP कॅमेरासह Oppo Reno 7, Reno 7 Pro लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : ओप्पो रेनो 7 (Oppo Reno 7) सिरीजचं लाँचिंग जवळ आलं आहे. नुकतेच या आगामी स्मार्टफोनची किंमत, डिझाइन आणि फीचर्स लीक झाले आहेत. त्याची चार्जिंग क्षमता चीनच्या 3C सर्टिफिकेशन साइटवर नोंदवली गेली आहे. एका रिपोर्टमध्ये आगामी स्मार्टफोन्सचा प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगण्यात आले आहे. बहुतेक अहवाल पेटंट इमेजेससह Oppo Reno 7 Pro चे डिझाइन, व्हॅनिला Oppo Reno 7 चे प्रमुख फीचर्स तसेच Oppo Reno 7 सिरीजमधील दोन्ही स्मार्टफोन्सच्या किमतींकडे लक्ष वेधतात. (Oppo Reno 7, Reno 7 Pro, Price, Specifications Leak Ahead of Official launching)

Oppo Reno 7, Reno 7 Pro च्या संभाव्य किंमती

GSMArena च्या रिपोर्टमध्ये Oppo Reno 7 सीरीजच्या किमतींची माहिती देण्यात आली आहे. Oppo Reno 7 च्या 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 2,999 (अंदाजे 35,200 रुपये) असू शकते. तर 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 3,299 (अंदाजे 38,700 रुपये) असू शकते.

Oppo Reno 7 Pro चे specifications

Oppo Reno 7 Pro ची 3C लिस्टिंग MySmartPrice ने स्पॉट केली आहे. यामध्ये, आगामी Oppo स्मार्टफोनचे मॉडेलचे PFDM00 असे वर्णन केले आहे आणि हे डिव्हाईस 65W SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी असल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्टमध्ये असेही सुचवण्यात आले आहे की Oppo Reno 7 Pro हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 1200 SoC सह सुसज्ज असू शकतो. हा फोन 12GB पर्यंत RAM आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेजसह सादर केला जाण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन पुढील काही महिन्यांत लॉन्च होण्याची शक्यता आहे. Oppo Reno 7 Pro च्या बॅक पॅनलवर एक क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे जो वरच्या डाव्या कोपऱ्यात आयताकृती आकारात दिला जाईल.

Oppo Reno 7 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

रेनो 7 सीरीज अंतर्गत तीन नवीन स्मार्टफोन लाँच होतील. कंपनी यावेळी एक नवीन एसई मॉडल लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा फुल एचडी प्लस ओएलईडी डिस्प्ले दिला जाईल. याच्या व्हॅनिला मॉडेलमध्ये 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट असेल. या फोनमध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,500 mAh बॅटरी दिली जाईल, असा दावा करण्यात आला आहे. तसेच यात मीडियाटेक डायमेन्सिटी 920 SoC प्रोसेसर दिला जाऊ शकतो, सोबत LPDDR4x रॅम आणि UFS 3.1 स्टोरेजसह पेअर केला जाईल.

इतर बातम्या

Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश

दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय

Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?

(Oppo Reno 7, Reno 7 Pro, Price, Specifications Leak Ahead of Official launching)