दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय

Jio आणि Google ने आज जाहीर केले की बहुप्रतिक्षित JioPhone Next हा स्मार्टफोन खास दोन्ही कंपन्यांनी भारतासाठी डिझाइन केलेला आहे. JioPhone Next दिवाळीच्या दिवशी सादर केला जाणार आहे आणि तो एक अतिशय स्वस्त स्मार्टफोन असल्याचे सिद्ध होईल.

दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय
JIOPHONE NEXT
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 7:08 PM

मुंबई : Jio आणि Google ने आज जाहीर केले की बहुप्रतिक्षित JioPhone Next हा स्मार्टफोन खास दोन्ही कंपन्यांनी भारतासाठी डिझाइन केलेला आहे. JioPhone Next दिवाळीच्या दिवशी सादर केला जाणार आहे आणि तो एक अतिशय स्वस्त स्मार्टफोन असल्याचे सिद्ध होईल. JioPhone Next ची एंट्री प्राईस फक्त 1,999 रुपये असेल आणि शिल्लक रक्कम 18/24 महिन्यांत सहज EMIs द्वारे भरता येईल. (JIOPHONE NEXT sale live from Diwali at 1999 with EASY EMI option)

जिओफोन नेक्स्टचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, हा फोन त्या लोकांसाठी तयार केला जात आहे, जे जास्त किंमतीमुळे टचस्क्रीन स्मार्टफोन खरेदी करण्यास तयार नाहीत. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमचं लाईट व्हर्जन वापरलं जाईल, जे अँड्रॉइड गो असू शकते. अँड्रॉइड गो प्रोग्राम विशेषतः त्या लोकांसाठी तयार करण्यात आला आहे, जे एंट्री लेव्हल आणि लो कॉन्फिगरेशन स्मार्टफोन खरेदी करतात.

JIOPHONE NEXT स्वस्तात खरेदीचे तीन पर्याय

  1. पहिला हा ‘ऑलवेज ऑन प्लॅन’ आहे, या प्लॅनमध्ये ग्राहकाला 18 महिन्यांसाठी 350 रुपये आणि 24 महिन्यांसाठी 300 रुपये द्यावे लागतील. प्लॅनमध्ये ग्राहकांना दर महिन्याला 5 GB डेटा आणि 100 मिनिटे व्हॉइस कॉलिंग मिळेल.
  2. दुसरा प्लॅन आहे लार्ज प्लॅन, यामध्ये ग्राहकांना 18 महिने 500 रुपये किंवा 24 महिने 450 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळेल.
  3. तिसरा प्लॅन XL प्लॅन आहे, यामध्ये ग्राहकाला दररोज 2 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. या प्लॅनसाठी ग्राहकाला 18 महिने 550 रुपये किंवा 24 महिने 500 रुपये भरावे लागतील.

JioPhone Next मधील 8 महत्त्वाचे फीचर्स

  • JioPhone Next अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमच्या ऑप्टिमायझ्ड व्हर्जनवर काम करतो, हे व्हर्जन जिओ आणि गुगलने संयुक्तपणे विशेषतः भारतीय बाजारासाठी विकसित केले आहे.
  • JioPhone नेक्स्ट अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह येतो ज्यामध्ये व्हॉईस असिस्टंट, भाषा अनुवाद, स्क्रीन टेक्स्टचा स्वयंचलित रीड-अलाऊड आणि यात ऑगमेंटेड रिअॅलिटी फिल्टरसह स्मार्ट कॅमेरा आहे.
  • JioPhone नेक्स्ट 4000 ते 5000 रुपयांच्या अंदाजे किंमतीसह लाँच केला जाऊ शकतो. पण रिलायन्स जिओ या फोनची किंमत कमी करण्यासाठी अधिक ऑफर देऊ शकते.
  • जिओफोन नेक्स्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 215 प्रोसेसरसह लॉन्च होण्याची शक्यता आहे जे 4 जी नेटवर्कला सपोर्ट करते.
  • रिलायन्स जिओ खरेदीदाराला 2 जीबी रॅम आणि 3 जीबी रॅम व्हेरिएंट असे दोन पर्याय मिळतील, अशी अपेक्षा आहे. इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये, जिओ 16GB व्हेरिएंट आणि 32GB व्हेरिएंट लॉन्च करू शकते.
  • डिव्हाइसला HD रिझोल्यूशनसह 5.5 इंच डिस्प्ले मिळेल अशी अपेक्षा आहे.
  • नवीन जिओफोन नेक्स्ट ब्लू व्हेरिएंटसह विविध रंगांमध्ये लॉन्च केला जाईल.

इतर बातम्या

लेनोवो टॅब K10 टॅब्लेट भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

ठरलं ! JioPhone Next ‘या’ दिवशी भारतात दाखल होणार, जाणून घ्या संभाव्य किंमत, तपशील आणि वैशिष्ट्ये

6000mAh बॅटरीसह येतात ‘हे’ 4 फोन, ज्याची सुरवातीची किंमत आहे 7,299 रुपये

(JIOPHONE NEXT sale live from Diwali at 1999 with EASY EMI option)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.