लेनोवो टॅब K10 टॅब्लेट भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

Lenovo Tab K10 ची सुरुवातीची किंमत 25,000 रुपये आहे. सध्या कंपनीच्या वेबसाइटवर फेस्टिव्ह सेल डिस्काउंट उपलब्ध आहे. केवळ वायफाय आणि वायफाय + 4 जी एलटीई आवृत्त्या 13,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहेत.

लेनोवो टॅब K10 टॅब्लेट भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन
लेनोवो टॅब K10 टॅब्लेट भारतात लॉन्च

नवी दिल्ली : लेनोवो टॅब K10 भारतात लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. मुख्य स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे तर हे टॅब्स 7500 mAh बॅटरीसह येतात. याशिवाय, यात Octacore MediaTek Helio P22T प्रोसेसर आणि 4 GB पर्यंतची रॅम देण्यात आली आहे. या टॅबलेटमध्ये फास्ट चार्जिंग आणि ड्युअल स्पीकर देण्यात आले आहेत, जे डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करतात. तसेच हा टॅब्लेट लेनोवो अॅक्टिव्ह पेन स्टायलससह येतो. (Lenovo Tab K10 Tablet Launched In India, Know Price And Specification)

Lenovo Tab K10 ची किंमत

Lenovo Tab K10 ची सुरुवातीची किंमत 25,000 रुपये आहे. सध्या कंपनीच्या वेबसाइटवर फेस्टिव्ह सेल डिस्काउंट उपलब्ध आहे. केवळ वायफाय आणि वायफाय + 4 जी एलटीई आवृत्त्या 13,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहेत. या किंमतीत 3 जीबी रॅम आणि 32 जीबी अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे. 4 जीबी रॅम + 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे, ज्यामध्ये फक्त वाय-फाय आवृत्ती येते, तर वाय-फाय + 4 जी एलटीई व्हेरिएंटची किंमत 16999 रुपये आहे. तसेच 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट अद्याप उपलब्ध नाही.

Lenovo Tab K10 चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

Lenovo Tab K10 मध्ये 13.6-इंचाचा फुलएचएचडी डिस्प्ले आहे, ज्याला 400 निट्स पीक ब्राइटनेस मिळतो. या टॅबच्या आतील बाजूबद्दल बोलायचे झाल्यास, यात Octacore MediaTek Helio P22 चिपसेट देण्यात आला आहे, जो PowerVR GE8320 GPU सह येतो. या फोनमध्ये 4GB LPDDR4x रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेज आहे. आवश्यक असल्यास वापरकर्ते 2 टीबी पर्यंत एसडी कार्ड जोडू शकतात.

Lenovo Tab K10 चा कॅमरा सेटअप

Lenovo Tab K10 च्या कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे झाले तर यात 8-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. यात ड्युअल बँड वायफाय आणि ब्लूटूथ v5 सपोर्ट आहे. तसेच, वापरकर्त्यांना टाईप सी यूएसबी केबल मिळेल. या टॅब्लेटमध्ये 7500 mAh बॅटरी आहे, जी चार्जिंगसाठी 10W फास्ट चार्जर मिळवते. या टॅब्लेटमध्ये ड्युअल स्पीकर्स आणि डॉल्बी एटमॉस सपोर्ट करण्यात आले आहेत. या टॅबचे वजन 460 ग्रॅम आहे. (Lenovo Tab K10 Tablet Launched In India, Know Price And Specification)

इतर बातम्या

समीर वानखेडेंना पहिला धक्का, मुंबई सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली! आता पुढे काय?

सोयाबीनचे दर गडगडले, ऐन सणात शेतकऱ्यांची अडचण, वाचा शेतीमालाचे दर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI