आता एआयचा फ्रीज आला, समजणार कोणते पदार्थ संपले, भाजी काय करायची? फीचर्स वाचून चकित व्हाल; किंमत किती?

AI टच देत SAMSUNG या कंपनीने लेटेस्ट फ्रिज आणि एसी लाँच केले आहे. फक्त एका कमांडवर तुम्हाला रेसिपी तयार करून मिळेल तसेच आपल्या सोयीनुसार आपल्याला हवे तसे एसीचे कुलींग फक्त व्हॉईस कमांडवर अँडजेस्ट करता येणार आहे.

आता एआयचा फ्रीज आला, समजणार कोणते पदार्थ संपले, भाजी काय करायची? फीचर्स वाचून चकित व्हाल; किंमत किती?
AI FRIDGE
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 17, 2026 | 6:19 PM

फ्रिजमध्ये सामान ठेवायचं, दार बंद करायचं आणि बस्स… आत काय आहे ठेवलंय हे आठवण्यासाठी पुन्हा पुन्हा फ्रिज उघडण्याचे दिवस आता लवकरच संपणार आहेत. कारण SAMSUNG ने भारतात आपली २०२६ BESPOKE AI HOME APPLIANCES ची नवीन रेंज लाँच केली आहे. यामध्ये AI सह स्मार्ट फ्रिज आणि दोन वेगवेगळ्या प्रकारचे AC लाँच करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या उपकरणांना एकमेकांशी कनेक्ट करता येणार असून घरातील काम अधिक फास्ट आणि स्मार्ट पद्धतीने करता येणार आहे.

SAMSUNG चे AI फ्रिज आणि AC भारतात लाँच ४ लाखांपासून फ्रिज उपलब्ध

SAMSUNG ने भारतात 2026 BESPOKE AI HOME APPLIANCES ची नवीन रेंज लाँच केली आहे. दि ब्रिफ गुरूग्राम या इव्हेंटमध्ये कंपनीने FAMILY HUB REFRIGERTOR, BESPOK AI WINDFREE PRO AC आणि INFINITE 1 – WAY CASSETTE AC लाँच केले जाणार आहे. या उपकरणांमध्ये AI, SMARTTHINGS कनेक्टिव्हीटी आणि स्मार्ट होम फिचर्सवर भर देण्यात आला आहे. या फ्रिजची सुरूवातीची किमत ४,००,६९० रूपये आहे. यात ३२ इंचाचा टचस्क्रिन डिस्प्ले GOOGLE GEMINI आधारित AI फिचर्स आणि AI VISION कॅमेरा मिळतो. हा कॅमेरा फ्रिजमधील वस्तू ओळखण्यास आणि फ्रिजमधे कोणती वस्तू कुठे आहे हे ओळखण्यास मदत करणार आहे.

तसेच AI FOOF MANAGER हे फिचर सध्या फ्रिजमध्ये कोणते पदार्थ आहेत. त्यापासून तुम्ही कोणता पदार्थ सहज बनवू शकता. पदार्थ बनवण्याच्या टिप्स आणि ट्रिक्स देखील सांगणार आहे. याशिवाय तुम्ही नोट्स, शेड्यूल, आणि अनेक व्हिडिओज बघू शकता. त्यामुळे जेवण करताना येणारा कंटाळा दूर होणार आहे. कुटुंबातील माणसांपासून ते पाळीव प्राण्यांपर्यंत कोणाला काय खायला आवडते याची काळजी सुद्धा हा फ्रिज घेणार आहे.

१.६० लाखांचा WINDFREE CASSETTE AC

SAMSUNG INFINITE 1 -WAY CASSETTE AC WITH WINDFREE ची सुरूवातीची किंमत १.६० लाख इतकी आहे. हा AC 3.5 KW , 5.2 KW , 7.1 KW इतकी कूलिंग देणार आहे. यामध्ये WINDFREE TECHNOLOGY सह 23,000 मायक्रो – होल्स देण्यात आले आहेत. तसेच AI ENERGY MODE मुळे 30 टक्क्यांपर्यंत वीजेची बचत होणार आहे. तसेच या AC मध्ये वार्म लाईट्सही असतील. BESPOKE AI WINDFREE PRO AC ची सुरूवातीची किंमत 69,990 रूपये आहे, यात AI आधारित CONTROLS, PM1.0 PURIFICATION देखील समाविष्ट आहे.

BIXBY आणि KNOX चीही साथ

SAMSUNG च्या या लेटेस्ट गॅजेट्समध्ये BIXBY आणि KNOX चा समावेश आहे. BIXBY मुळे आवाजाच्या मदतीने देखील फ्रिज आणि AC कंट्रोल करता येणार आहे. तसेच KNOX सिक्यूरिटीची काम करणार आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us