UPI Payment : Samsung युजर्ससाठी गुड मोठी गुड न्यूज, कंपनीने लाँच केल खास फिचर, Fingerprint करू शकता UPI Payment

Samsung Walletने भारतातील Galaxy युजर्ससाठी UPI पेमेंटमध्ये बायोमेट्रिक प्रमाणीकरणाची सुविधा आणली आहे. पात्र ₹10,000 पर्यंतच्या व्यवहारांसाठी UPI PIN ऐवजी Fingerprintचा वापर करता येणार आहे.

UPI Payment :  Samsung  युजर्ससाठी गुड मोठी गुड न्यूज, कंपनीने लाँच केल खास फिचर, Fingerprint करू शकता UPI Payment
UPI PAYMENT
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 25, 2026 | 5:08 PM

UPI ने पेमेंट करणे रोजच्या सवयीचा भाग झाला आहे. स्कॅन करा, पिन टाका पेमेंट करा ही काम तर अशी एका चुटकीत करून टाकतो. एका चुटकीत पैसे ट्रान्सफर करतो. पण आता हेच पेमेंट आणखी फास्ट वेगवान पद्धतीने करू शकताय. Samsung ने यूजर्ससाठी एक मोठी अपडेट समोर आणली आहे. त्यामुळे पिन न टाकता तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता.

Samsung Galaxy ने पेमेंट पद्धत अधिक सोईस्कर आणि वेगवान व्हावी यासाठी upi मध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे यूजर्स सोप्या आणि वेगवान पद्धतीने पैसे ट्रान्सफर करू शकणार आहेत. आपण साधारणत: पेमेंट करण्याआधी स्कॅनर स्कॅन करायचो. त्यानंतर किती पैसे पाठवायचे आहेत तितकी रक्कम टाकतो. ती रक्कम टाकल्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पिन नंबर, पिन नंबर टाकल्याशिवाय कोणतेही पेमेंट करता येत नाही. मग पेमेंट पूर्ण होते. त्यातच आता बदल करत Samsung यूजर्स १०,००० पर्यंतची रक्कम UPI पिन टाकल्याशिवाय म्हणजेच फिंगरप्रीट च्या मदतीने पाठवू शकता.

उत्तम प्रायव्हसी मिळणार

या फिचरमुळे यूजर्सना भरपूर प्रायव्हसी मिळणार आहे. कारण सार्वजनिक ठिकाणी UPI द्वारे पेमेंट करताना पिन नंबर कितीही लपवला तरी तो सर्वांना दिसतो त्यामुळे प्रायव्हसी मिळत नाही. त्यामुळे फिंगरप्रींटच्या मदतीने सहज पेमेंट करता येणार आहे. त्यामुळे सारखे पिन नंबर टाकण्याची गरज भासणार नाही.

SAMSUNG WALLET मध्ये मिळणार आणखी काही फिचर्स

SAMSUNG वॉलेटमध्ये फिंगरप्रीट पेमेंटशिवाय बऱ्याच सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. UPI पेमेंट सोबतच टोकनाइज्ड क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डमधून तुम्ही यूटिलिटी बिल आणि कान्टॅक्टलेस पेमेंट करू शकता. याशिवाय बोर्डिंग पास, तिकिट आणि ID कार्ड यांसारख्या गोष्टी SAMSUNG WALLET मध्ये स्टोर करू शकता.

UPI पिन केव्हा लागू शकतो

UPI पेमेंट्सचा फिंगरप्रिंटचा ऑप्शन फक्त १०,००० रूपयापर्यंतच्या पेमेंटसाठी मर्यादित आहे. यावरचे पेमेंट करायचे असल्यास UPI पिन ची आवश्यकता लागणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us