4000 mAh ची बॅटरी असलेला सॅमसंगचा गॅलेक्सी ए-30 आणि ए-50 लाँच

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

मुंबई : साउथ कोरियाची कंपनी सॅमसंगने आज गॅलेक्सी ए सीरीजचे दोन नवे स्मार्ट फोन लाँच केले. सॅमसंगने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2019 मध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए-30 आणि सॅमसंग गॅलेक्सी ए-50 हे दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. मात्र, यांच्या किंमतींबाबत अद्याप कंपनीने कुठलीही माहिती दिलेली नाही. येत्या 28 फेब्रुवारीला मुंबईत होणाऱ्या इव्हेंटमध्ये कंपनी या दोन्ही स्मार्टफोन्सना […]

4000 mAh ची बॅटरी असलेला सॅमसंगचा गॅलेक्सी ए-30 आणि ए-50 लाँच
Follow us on

मुंबई : साउथ कोरियाची कंपनी सॅमसंगने आज गॅलेक्सी ए सीरीजचे दोन नवे स्मार्ट फोन लाँच केले. सॅमसंगने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2019 मध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए-30 आणि सॅमसंग गॅलेक्सी ए-50 हे दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. मात्र, यांच्या किंमतींबाबत अद्याप कंपनीने कुठलीही माहिती दिलेली नाही. येत्या 28 फेब्रुवारीला मुंबईत होणाऱ्या इव्हेंटमध्ये कंपनी या दोन्ही स्मार्टफोन्सना भारतीय बजारात उतरवू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी ए-50 चे स्पेसिफिकेशन :

सॅमसंग गॅलेक्सी ए-50 मध्ये 6.4 इंचाचा फुल-एचडी + सुपर एमोलेड इनफिनिटी यू स्क्रिन देण्यात आली आहे. याचं रिझॉल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे. या स्मार्टफोनचा अॅस्पेक्ट रेशिओ 19.5:9 आहे. या स्मार्टफोनला 4जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 6 जीबी आणि 128 इंटरलन स्टोरेज या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आलं आहे. यामध्ये 4000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये तीन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. 25 मेगापिक्सल + 5 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सल असे तीन रिअर कॅमेरे तर 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा यात देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए-30 चे स्पेसिफिकेशन :

सॅमसंग गॅलेक्सी ए-50 प्रमाणेच सॅमसंग गॅलेक्सी ए-30 मध्ये 6.4 इंचाचा फुल-एचडी + सुपर एमोलेड इनफिनिटी यू स्क्रिन देण्यात आली आहे. याचं रिझॉल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे. या स्मार्टफोनचा अॅस्पेक्ट रेशिओ 19.5:9 आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आलं आहे. याला 3 जीबी आणि 4 जीबीच्या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आलं आहे. यामध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. यामध्येही 4000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये 16+5 मेगापिक्सलचा रिअर आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.