Huawei चा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, किंमत तब्बल…

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

मुंबई : चायनाची स्मार्टफोन बनवणारी कंपनी Huawei ने 2019 च्या वर्ल्ड काँग्रेसमध्ये 5G फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनचं  Huawei Mate X असे नाव देण्यात आलं आहे. काहीच दिवसांआधी सॅमसंग कंपनीने पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला होता. तसेच आता अनेक मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांनी फोल्डेबल स्मार्टफोन बनवणार असल्याची घोषणा केली आहे. Huawei च्या नवीन फोल्डेबल […]

Huawei चा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, किंमत तब्बल...
Follow us on

मुंबई : चायनाची स्मार्टफोन बनवणारी कंपनी Huawei ने 2019 च्या वर्ल्ड काँग्रेसमध्ये 5G फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनचं  Huawei Mate X असे नाव देण्यात आलं आहे. काहीच दिवसांआधी सॅमसंग कंपनीने पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला होता. तसेच आता अनेक मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांनी फोल्डेबल स्मार्टफोन बनवणार असल्याची घोषणा केली आहे.

Huawei च्या नवीन फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोल्ड केल्यानंतर याचा डिस्प्ले 6.6 इंचाचा होतो. सॅमसंग प्रमाणेच यातही कुठल्याही प्रकारचा डिस्प्ले नॉच देण्यात आलेला नाही. या स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटरनल मेमोरीच्या व्हेरिअंटची किंमत 2 लाख 10 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. काहीच महिन्यांत या फोनची विक्री सुरु होईल अशी माहिती आहे. मात्र, कंपनीने अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. हुवाई लवकरच Mate 20X लाँच करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. हा एक 5G स्मार्टफोन असणार आहे.

Huawei Mate X हा एक डुअल सिम स्मार्टफोन आहे. यामध्ये अॅंड्रॉईड व्हर्जन 9 पाय देण्यात आलं आहे. याचा फ्रंट डिस्प्ले 6.6 इंचाचा आहे. तर मागचा डिस्प्ले 6.38 इंचाचा आहे. अनफोल्ड केल्यानंतर याचा डिस्प्ले हा 8 इंचाचा होतो. अनफोल्ड केल्यानंतर याची जाडी 5.4mm असते, जी iPad Pro च्या जाडीपेक्षाही कमी आहे. तर फोल्ड केल्यानंतर याची जाडी 11mm होऊन जाते. या स्मार्टफोनमध्ये टू-इन-वन स्मार्टफोन देण्यात आला आहे. यामध्ये 4500 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 30 मिनटांत हा स्मार्टफोन 85 टक्के चार्ज होतो. 5G नेटवर्क मिळाल्यानंतर हा फोन 3 सेकंदात 1 जीबीचा सिनेमा किंवा कुठलाही कंटेंट डाउनलेड करु शकतो.