Viral Video : आईची तब्बेत बिघडली, तर 14 वर्षांच्या मुलाने असं काही केलंय, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याचं प्रचंड कौतुक होतंय
मुलांनाही स्वयंपाक शिकवा! सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या 'या' व्हिडिओने समाजाला दिला एक मोलाचा संदेश. घरकाम फक्त महिलांचंच नाही; आजारी आईला मदत करणाऱ्या चिमुरड्याच्या 'या' कृतीवर आणि संस्कारांवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव.

घरात आई आजारी पडली कि सगळ्यांची तारांबळ उडते. रोज सगळ्यासाठी स्वयंपाक करणारी, घरचं काम करणारी आई जेव्हा आजारी पडते, तेव्हा घरातल्या लोकांनी तिची खरी किंमत कळते. अशाच वेळी जर
आईचा लेकरू पुढे आलं आणि म्हणालं की ” आई तू आराम कर आज मी किचन सांभाळतो, मी जेवण करतो. तर आईला यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणती असेल. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आईची तब्बेत बरी नसताना हा मुलगा थेट किचनमध्ये गेला आणि संपूर्ण जेवण केलं. त्याचा व्हिडिओ त्याच्या आईने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हा व्हिडिओ त्या मुलाच्या आईने म्हणजे निशा तनवर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांचा 14 वर्षांचा मुलगा रूचित किचनमध्ये चपातीसाठी पीठ मळताना दिसत आहे. निशा यांनी सांगितलं की त्यांना सर्दी – खोकला , अशक्तपणा आणि थकवा जाणवत होता. अशा वेळी मुलाने स्वत : हून पुढे येत किचनमध्ये मदत करण्याचे ठरवले.
फक्त पीठ मळतच नाही तर चपात्याही लाटतो
रूचितच्या आईच्या म्हणण्यांनुसार रूचितला पीठ मळण्यासोबत चपात्या बनवायही येतात. एवढंच नाही तर तो भाजी बनवण्यासारखी इतर कामही हळूहळू शिकत आहे. म्हणजे किचनमध्ये जाणं हे काही त्याच्यासाठी नवीन काम नाही. या व्हिडिओमध्ये अनेक घरांमध्ये मुलींना लहानपणापासून किचनमधली जेवणाची संपूर्ण काम शिकवली जातात. पण मुलांना या कामापासून दूर ठेवलं जातं. मुलांना ही काम शोभत नाहीत, अस शिकवलही जातं.
घरकाम करण ही लाज वाटण्याची गोष्ट नाही. उलट स्वत : च्या घरातल्या जबाबदाऱ्या समजून घेणं आणि त्या पार पाडणं महत्त्वाचं असतं. घराची जबाबदाराी फक्त आईची किंवा मुलीची नसते तर घरात राहणाऱ्या प्रत्येकाची असते.
सोशल मीडियावर आईच्या संस्कारांच कौतुक
रूचितचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी रुचितच्या आईच्या संस्काराचं कौतुक केलं आहे. त्यासोबतच रूचितलाही आर्शिवादही दिले आहेत. मुलीप्रमाणे प्रत्येक मुलाचही कर्तव्य असतं कि त्याने वेळ आल्यावर किचनची जबाबदारी स्वीकारावी.