सॉरी, सॉरी, सॉरी… चुकून तुमची नसबंदी झालीय; रुग्णालयाने एका झटक्यात तरुणाचं आयुष्य केलं बरबाद

| Updated on: Mar 02, 2024 | 2:29 PM

एका युवकासोबत हैराण करणारा प्रकार घडलाय. या प्रकारानंतर मोठी खळबळ निर्माण झालीये. हेच नाही तर या प्रकारानंतर युवकाचे संपूर्ण आयुष्यच हे बदलून गेलंय. आता हा युवक थेट कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचे देखील सांगितले जातंय. रुग्णालयातील एका प्रकारानंतर लोक हैराण झाले आहेत.

सॉरी, सॉरी, सॉरी... चुकून तुमची नसबंदी झालीय; रुग्णालयाने एका झटक्यात तरुणाचं आयुष्य केलं बरबाद
Follow us on

मुंबई : नुकताच एक अत्यंत हैराण करणारा प्रकार घडलाय. या प्रकारानंतर मोठी खळबळ निर्माण झालीये. चक्क एका युवकाचे आयुष्यच बदलून गेलंय. या प्रकारानंतर मोठा संताप हा व्यक्त केला जातोय. डॉक्टरांच्या एका चुकीमुळे युवक हतबल झाला असून पूर्ण बरबाद झालाय. युवक हा रुग्णालयात पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पोहचला. मात्र, काही कारणामुळे त्याची शस्त्रक्रिये पुढे ढकलण्यात आली. मात्र, अचानक डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रियेसाठी घेतले आणि थेट नसबंदीचीच शस्त्रक्रिया केली. या प्रकारानंतर मोठी खळबळ बघायला मिळतंय.

त्याचे झाले असे की, अर्जेंटिनातील एक युवक पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात पोहोचला. परंतू त्यावेळी त्याला मुळातही कल्पना नव्हती की, त्याच्यासोबत नेमके काय घडणार आहे. जॉर्ज बेसटो हा फ्लोरेंसिओ डायझ कॉर्डोबाच्या रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल झाला. त्याची शस्त्रक्रिया ही 28 फेब्रुवारी 2024 ला होणार होती.

काही कारणामुळे त्याची शस्त्रक्रिया बुधवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र, अचानक त्याचे पेपर न चेक करता त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्यानंतरही जॉर्जला माहिती नव्हती की, आपल्यासोबत काय घडतंय. यानंतर दुसरे दिवशी त्याच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया होणार होती. मात्र, त्यावेळी त्याच्याकडे डाॅक्टर आले.

डॉक्टरांनी घडलेला सर्व प्रकार हा जॉर्ज बेसटो याला सांगितला. जॉर्ज बेसटो याला काही वेळ काय घडत आहे हेच समजले नाही. यानंतर कोणीही घडलेल्या प्रकारची जिम्मेदारी घेण्यास तयार नव्हते. यानंतर पित्ताशयाची शस्त्रक्रिया जॉर्ज बेसटो याच्यावर झाली. या प्रकारानंतर जॉर्ज बेसटो याचे संपूर्ण जिवनच बदलून गेले. घडलेला प्रकार देखील काय घडला हे त्याला सांगितले गेले नाही.

नसबंदी झाल्यानंतर जॉर्ज बेसटो याने मोठा खुलासा केलाय. जॉर्ज बेसटो याने म्हटले की, या प्रकाराची जिम्मेदारी घेण्यास कोणीही तयार नाहीये. मला शस्त्रक्रियेसाठी घेऊन जाण्याच्या पूर्वी किमान एकवेळ तरी त्यांनी माझा चार्ट बघायला हवा. मी कोणालाही दोष देत नाहीये, परंतू हा प्रकार हैराण करणार आहे. असे सांगितले जाते की, जॉर्ज बेसटो हा या प्रकरणाच्या विरोधात कोर्टात धाव घेणार आहे.