Viral Video : गरबा खेळायला आलेल्या मुलाने लावला पाण्याचा स्टॉल, एका दिवसाची कमाई जाणून व्हाल थक्क

गरबा खेळायला आलेल्या एका मुलाने दर दिवशी पाण्याच्या बॉटल्स विकल्या. दर दिवशी हजारोंमध्ये कमाई केली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच्या कमाईचा आकडा पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत.

Viral Video :  गरबा खेळायला आलेल्या मुलाने लावला पाण्याचा स्टॉल, एका दिवसाची कमाई जाणून व्हाल थक्क
garba water bottles
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2026 | 5:47 PM

नवरात्रीत कोणी गरबा खेळण्यात मग्न असतं, तर कुणी डान्सचे व्हिडिओ बनवण्यात व्यस्त, तर कुणी नटूनथटून फोटो काढण्यात दंग, पण याच गर्दीचा फायदा घ्यायला हवा अस एका 17 वर्षांच्या पोराला वाटलं आणि त्याने आयडियाची कल्पना करत धंदाच सुरू केला. आता तुम्ही म्हणाल एवढ्या गर्दीत त्याने कसला बिझनेस केला. अहो पठ्ठ्याने धंदा अगदीच साधा टाकलाय तो धंदा म्हणजे पाण्याच्या बॉटल्स आणि कोल्ड ड्रिंक्सचा. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याने सांगितलेली कमाई ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल.

 

Loading...

एका दिवसात विकल्या 100 पेट्या पाणी

वातावरणात असलेली गरमी, त्यात नाचल्यावर लागणार दम येणारा घाम त्यामुळे पाण्याची गरज तर प्रत्येकालाच पडते. याच साध्या गोष्टीवर लक्ष देत. एका 17 वर्षीय पोराने पाण्याचा आणि कोल्ड ड्रिंक्सचा धंदा टाकला. बघता बघता एका दिवसात या पोराने 100 पेट्या पाण्याच्या बॉटल्स विकल्या. आता याचा हिशोब मांडला तर एका पेटीत 24 बाटल्या, तर 100 पेट्या म्हणजे 2,400 बाटल्या. प्रत्येक बाटली या पोराने 20 रूपयांना विकली म्हणजे एका दिवसात या 17 वर्षाच्या पोराने 48 हजारांची कमाई केली.

 

 

या मुलाने गरबा मैदानात स्टॉल लावण्यासाठी दररोज जवळपास 20 हजार रूपये भाडं दिल्याचं सांगितलं आहे. आता एवढं भाडं ऐकून सामान्य माणूस दहा वेळा विचार करेल पण या मुलाने तिथेच व्यवसायाची संधी शोधली. बाकीचे लोक गरब्याच्या तालावर ठेका धरत होते आणि हा पठ्ठ्या इथे हजारोंची कमाई करत होता.  हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक त्याच्या या बिझनेस स्किल्सचे कौतुक करत आहेत. तर काहींनी त्याच्या बिझनेस स्किल्सवर त्याच्या कमाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us