आजूबाजूला भयानक शार्क, मृत्यूच्या दाढेत असताना केलं प्रपोज, प्रेयसीने केलं असं काही की… Viral Video ची एकच चर्चा!
एक अनोख प्रपोजं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रिटनच्या एका तरूणाने त्याच्या प्रेयसीला पाण्याखाली आजूबाजूला शार्क असताना प्रपोज केलं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

प्रेमात लोक आकंठ बुडालेले असतात. त्यामुळे आपल्या प्रेमाला मिळवायला कोण काय करेल याचा पत्ता नाही. प्रपोज करण्यासाठी प्रत्येक जण काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करतो. कुणी समुद्रकिनारा निवडंत, कुणी एखाद्या रोमँटिक ठिकाणी, पण कुणी तरी यापेक्षा वेगळा भन्नाट मार्ग निवडला. एका प्रियकराने चक्क त्याच्या प्रेयसीला पाण्याखाली प्रपोज केलाय. तेही शार्क माश्यांच्या मधोमध. ब्रिटनमधील एक तरूणाने शार्कच्यामध्ये जाऊन प्रेयसीला प्रपोज केलंय. विशेष म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंडला शार्क खूप आवडतात. त्यामुळे त्याने पाण्याखाली शार्क मासे आजूबाजूला असताना प्रेयसीला प्रपोज केलं आहे.
पाण्याखाली शार्कसोबत असतानाच दिली प्रेमाची कबूली
ही अनोखी घटना ब्रिटनमधील Lincolnshire येथील skegness aquarium मध्ये घडली. Buckinghamshire येथील james walsh आणि त्याची गर्लफ्रेंड paige cook हे शार्कसोबत ड्रायव्हिंगचा अनुभव घेण्यासाठी गेली होती. त्याच वेळी जेम्सने पेजला सरप्राइज देण्याचं ठरवलं आणि १० सप्टेंबरला पाण्याखाली त्याने लग्नासाठी प्रपोज केले.
जेम्सने हा प्लॅन अचानक केला नव्हता. त्याने प्रपोज करण्याआधीच skegness aquarium च्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला आणि प्लॅन तयार केला. पाण्याखाली समोर एक खास बोर्ड ठेवला. त्यावर will you marry me असे लिहिले होते. तिने आश्चर्याने स्कूबा मास्कवर हात ठेवला आणि नंतर हाताच्या इशाऱ्याने होकारही दिला. त्यानंतर दोघांनी पाण्याखालीच एकमेकांना मीठी मारली आणि रिंगही घातली .
हीच जागा का निवडली
जेम्सने प्रपोज करण्यासाठी हीच जागा का निवडली,यामागेही खास कारण आहे. पेजला शार्क खूप आवडतात आणि तिला शार्कसोबत स्कूबा डायव्हिंग करण्याची इच्छा होती. त्यामुळे तिच्या आवडीच्या प्राण्यांच्या मध्येच तिला प्रपोज करण्याचा जेम्सने निर्णय घेतला. त्याच्या मते हा क्षण कायम लक्षात राहणारा असावा म्हणून त्याने असे प्रपोज केले.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
skegness aquarium नेही या खास क्षणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत जेम्स आणि पेज यांचं अभिनंदन केलं. शार्कच्यामध्ये झालेल्या या अनोख्या प्रपोजलचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही त्याची चर्चा सुरू झाली आहे. नेहमीच्या प्रपोजलपेक्षा पूर्णपणे वेगळा असलेला हात क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.