काय आई-बाप आहेत, रीलच्या नादात मुलीला लाटांमध्ये सोडून दिलं आणि स्वत: VIDEO VIRAL
समुद्रकिनारी रिल शूट करताना या पालकांना कशाचेच भान राहिले नाही. मुलगी मागे पाण्यात पडली असताना सुद्धा त्यांचे रिल बनवणे थांबवले नाही. शेवटी दुसऱ्या माणसाने येऊन तिला उचलून घेतले. या पालकांच्या निष्काळजीपणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर जास्त व्ह्यूज मिळवण्याच्या नादात आपण काय करतोय याचा कित्येकांना अंदाजच नसतो. जिथे आपण रिल शूट करतोय तिथल्या चांगल्या, सुंदर गोष्टींसोबतच तिथे काय धोका आहे? याचा अंदाजच आपल्याला नसतो. विशेषत: समुद्राकिनाऱ्यालगत व्हिडिओ किंवा रील शूट करताना विशेष काळजी घ्यावी लागते.एका क्षणाचाही निष्काळजीपणा जीवावर बेतण्याची शक्यता असते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक जोडपे समुद्रकिनाऱ्यावर लाटांवरून चालताना आनंदाने चालताना दिसत आहे. पुढे चालणाऱ्या पुरूषाच्या हातात सेल्फी स्टीक आहे. तो स्वत:चा आणि त्याच्या बायकोचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. मागे असलेल्या महिलेच्या हातात त्यांची लहान मुलगीही दिसत आहे. लाटांच्या सारख्या होणाऱ्या माऱ्यामुळे त्या मुलीला तिच्या आईबाबांसोबत चालता येत नव्हत. त्यामुळे खाली पडली. मुलगी खाली पडली आहे हे कळून सुद्धा त्या कपलने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल आणि व्हिडिओ शूट करणं सूरूच ठेवलं.
मुलगी मागे पाण्यात गटांगळ्या खात होती. तरीही यांनी व्हिडिओ शूट करणे थांबवले नाही मुलीला वाचवले नाही. तितक्यात मागून एक माणूस आला आणि त्याने मुलीला उचलून धरले. त्यानंतर या महाशयांनी व्हिडिओ बंद केला आणि मुलीजवळ गेले.
सोशल मीडियावर संतापाची लाट
हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम वरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी पालकांच्या निष्काळजीपणावर सडकून टिका केली आहे. अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.एका यूजरने लिहिलंय की रिल काही सेकंदाचा असतो पण मुलाचा जीव हा अनमोल असतो. तर काही लोकांनी त्या वाचवणाऱ्या माणसाला खरा हिरो म्हटला आहे. पण काही यूजरना संशय आहे की हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असावा.