Viral Video : सोशल मीडिया पाहून पन्ना गाठले अन् हाती लागले 12 लाखांचे मौल्यवान हिरे; झोपडीत राहणारे दांपत्य झाले लखपती

सोशल मीडियावर पाहिलेल्या रीलवर विश्वास ठेवून पन्नात नशीब आजमावण्याचा निर्णय या दाम्पत्याने घेतला. सहा महिन्यांच्या मेहनतीनंतर नशीब फळफळले हाती लागले 12 लाखांचे हिरे

Viral Video : सोशल मीडिया पाहून पन्ना गाठले अन् हाती लागले 12 लाखांचे मौल्यवान हिरे; झोपडीत राहणारे दांपत्य झाले लखपती
viral news
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 03, 2026 | 8:09 PM

सोशल मीडियावर एखादी रील पाहून आपण फारतर एखादं ठिकाण फिरायला जातो, एखादी डिश ट्राय करतो किंवा एखादी वस्तू खरेदी करतो. पण उत्तर प्रदेशातील कपलने रील पाहून थेट पन्ना गाठलं. तिथे थेट जमीन खोदायला सुरूवात केली आणि हाती लागले चक्क लखलखणारे हिरे . नशीबावर विश्वास ठेवला अन् नशिबाने श्रीमंतही केलं यालाच नशिबाचा खेळ म्हणतात काय? सध्या ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याबद्दल जाणून घ्या सविस्तर

उत्तर प्रदेशातील झांसी येथील राजकुमार श्रीवास आणि त्यांच्या पत्नी गुड्डी देवी यांनी सोशल मीडियावर पन्ना येथील हिऱ्यांबाबतच्या बातम्या आणि रिल्स पाहिल्या. आर्थिक अडचणी आणि कामाची परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर विश्वास ठेवून पन्नाच्या हिऱ्यांबात नशीब आजमवायचे ठरवले. त्यानंतर ताबडतोब पन्ना गाठत थेट खोदकाम सुरू केलं.

Loading...

सहा महिने केली मेहनत

या दाम्पत्याने पन्ना जिल्ह्यातील सरकोहा परिसरातील भाडेतत्वावरील खाणीत जवळपास सहा महिने मेहनत केली. रोज खोदकाम करूनही सुरूवातीला त्यांच्या हाताला काही मोठं लागलं नाही. मात्र सहा महिन्याच्या मेहनतीनंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांच्या हाताला एक – दोन नव्हे तर तब्बल चार हिरे आले.

चार हिऱ्यांच वजन 5.16 कॅरेट

मिळालेल्या माहितीनुसार या चार कच्च्या हिऱ्यांच्या एकूण वजन 5.16 कॅरेट आहे. यातील दोन हिरे चांगल्या दर्जाचे असून त्यांचं वजन 1.62 आणि 1.29 कॅरेट आहे. चारही हिऱ्यांची अंदाजे किंमत जवळपास 12 लाख रूपये असल्याचं सांगण्यात आलं आहे.

आता या हिऱ्यांचा होणार लिलाव

हे हिरे सराकारी नियमांनुसार लिलावासाठी पाठवले जाणार आहेत. लिलावातून मिळणाऱ्या रकमेतील सरकारी रॉयल्टी आणि लागू कर वजा केल्यानंतर उर्वरित रक्कम दाम्पंत्याला मिळणार आहे. त्यामुळे त्या चार हिऱ्यांमुळे दांपत्य लखपती होणार आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us