Viral News : अरे बापरे! 24 कॅरेट गोल्ड देणारं एटीएम, पैसे टाकल्यावर पुढच्याच क्षणात…नक्की भानगड काय वाचा…
दुबईमध्ये काही काळ Gold To Go नावाची गोल्ड वेंडिंग मशीन उपलब्ध आहे, ज्यातून ग्राहकांना २४ कॅरेट सोन्याचे बार आणि नाणी खरेदी करता येत येतात. याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एटीएममध्ये कार्ड टाकलं की आपल्याला पैसे मिळतात, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण जरा कल्पना करा, कार्ड टाकलं आणि मशीनमधून नोटांऐवजी चक्क सोनं बाहेर आलं तर? अरे बापरे, हे काय आहे. असंच वाटेल ना पण दुबईमध्ये अशी गोल्ड एटीएम मशीन आहे. जिथून पैसे नाही तर चक्क सोन्याचे बार, नाणी आणि इतर गोल्ड प्रोडक्ट्स खरेदी करता येतात. विशेष म्हणजे यासाठी सोनाराच्या दुकानात जाण्याचीही नाही कारण ATM चं GOLD ATM आहे.
दुबई म्हटलं कि आलिशान गगनचुंबी इमारती, शॉपिंग आणि सोन्याच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. त्यात आता GOLD TO GO नावाच्या मशीचीही चर्चा होते. या मशीनच्या माध्यमातून ग्राहक टचस्क्रिनवरून सोन्याचे वेगवेगळे प्रोडक्ट्स निवडू शकतात आणि त्यानंतर पेमेंट करून सोनं घेऊ शकतात. या गोल्ड ATM मध्ये २४ कॅरेट सोन्याचे बार,नाणी आणि काही खास डिझाइन केलेले गोल्ड प्रोडक्ट्स उपलब्ध असतात. वेगवेगळ्या वजनाचे बार निवडण्याचाही पर्यायही असतो. म्हणजे नेहमीच्या सवयीप्रमाणे सोनं खरेदी करण्याऐवजी थेट मशीनच्या स्क्रिनवरून पर्याय निवडता येतो.
कार्डनेही करता येत पेमेंट
सोन निवडल्यानंतर पेमेंट करण्याची प्र्क्रिया सुरू होते. या मशीनमध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्डनेही पेमेंट करण्याची सुविधा आहे. या मशीनची आणखी एक खासियत म्हणजे सोन्याच्या किमती स्थिर नसतात. आंतरराष्ट्रिय सोन्याच्या बाजारातील दरानुसार मशीनवरील किंमती नियमितपणे अपडेटही होतात. त्यामुळे ग्राहकाला त्या वेळचा दरही दिसतो.
पेमेंटनंतर मिळतं सोनं
ग्राहकाने प्रोडक्ट्स निवडलं आणि पेमेंट केलं की मशीनमधील ऑटोमेटेड यंत्रणा काम करते. रोबोटिक सिस्टम निवडलेल्या सोन्याचा प्रोडक्ट बाहेर काढून डिस्पेसिंग एरियामध्ये आणते. त्यानंतर ग्राहकाला त्याचं पॅकेज मिळतं. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाला सोन्याचा प्रोडक्ट पॅकेजिंगसह दिला जातो. रिपोर्टनुसार गोल्ड प्रोडक्टसोबत पावती आणि त्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्रही दिल जातं. त्यामुळे मशीनमधून सोनं बाहेर आलं तरी ते फक्त साधं पॅकेट नसून खरेदीची आवश्यक कागदपत्रंही मिळतात.
म्हणजे आपल्याकडे ATM मध्ये कार्ड टाकलं की ” किती पैसे काढायचे?” असा प्रश्न असतो आणि दुबईच्या या GOLD ATM मध्ये प्रश्न होतो, किती सोनं काढायचे. सोनं खरेदी करण्याची ही पद्धत भन्नाट वाटत असली तरी यामागे ऑटोमेशन, डिजीटल पेमेंट आणि सुरक्षा तंत्रज्ञानाचा मोठा वापर करण्यात आला आहे.