Viral Video : जन्माला येताच बाळाचा नवाबी थाट…पायावर पाय अन्…काही मिनिटात व्हिडीओला 8 मिलियन व्ह्यूज!

नवजात बाळाचा निवांत झोपण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हात डोक्यामागे आणि पायावर पाय ठेवलेल्या बाळाचा राजेशाही थाट पाहून नेटकरी भारावून गेले आहेत. या व्हिडिओला जवळपास 8 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. यावर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

Viral Video : जन्माला येताच बाळाचा नवाबी थाट...पायावर पाय अन्...काही मिनिटात व्हिडीओला 8 मिलियन व्ह्यूज!
Egypt Newborn Baby's Relaxed Sleepping Pose goes viral
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 18, 2026 | 6:36 PM

बाळ जन्माला आल्यावर सगळ्यात पहिल काम करतं ते म्हणजे भरपूर रडणं. मनसोक्त रडणं. मग त्यासोबत या नव्या जगात हळूहळू आपले हात पाय पसरवतं, मोकळा श्वास घेतं. पण इजिप्तमधील एका बाळाचा काहीतरी वेगळाच अंदाज पाहायला मिळाला आहे. जन्मानंतर हे बाळ काही तासांतच अशा थाटात झोपलेलं दिसलं की तो क्षण डॉक्टरांनाही कॅमेऱ्यात टिपून ठेवावासा वाटला. हात डोक्यामागे, एका पायावर दुसरा पाय आणि चेहऱ्यावर राजेशाही स्मितहास्य… एवढ्याश्या बाळाने या राजेशाही थाटामुळे 8 मिलियन लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बाळाचा हा थाट राजेशाही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ कैरो येथील बालरोगतज्ञ आणि नवजात बाळांचे तज्ञ डॉ. इस्लाम एल्देह यांनी शेअर केला आहे. जन्मानंतरची वैद्यकिय तपासणी झाल्यानंतर बाळ निवांत अवस्थेत झोपलेलं दिसतं. त्याची ही झोपण्याची पद्धत पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. हात डोक्यामागे आणि पायावर पाय ठेवून पडलेलं हे बाळ पाहून लोकांनी त्याला जणू काही जन्मापासून आयुष्याचा फॉर्म्युला समजल्याच्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Loading...

 

 

 

व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी या बाळाच्या निवांत झोपण्याच्या अंदाजावर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी जन्माला येताच स्वॅग सुरू झाल्याचं म्हटलं आहे. या बाळाने सुरूवातीपासूनच आरामाचा मार्ग निवडल्याचा म्हटलं जातं आहे.

मात्र बाळाच्या एका व्हिडिओवरून त्याचा स्वभाव किंवा मनात काय सुरू आहे हे ठरवता येत नाही.नवजात बाळं वेगवेगळ्या हालचाली आणि झोपण्याच्या स्थिती दाखवू शकतात. तरीही या छोट्याशा क्षणाने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. डॉक्टरांनी हा व्हिडिओ एक गंमत म्हणून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला तब्बल 8 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us