हे कोडं आहे सर्वात अवघड, खडकांमध्ये लपलीये गोगलगाय, दिसणं अशक्य!

चला तर मग पाहूया की तुमची दृष्टी किती वेगवान आहे. फक्त ७ सेकंदात तुम्हाला याचं उत्तर शोधायचं आहे.

हे कोडं आहे सर्वात अवघड, खडकांमध्ये लपलीये गोगलगाय, दिसणं अशक्य!
Find the snail
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 29, 2022 | 5:24 PM

आजकाल निरीक्षण कौशल्य तपासण्यासाठी ऑप्टिकल भ्रमाचा वापर केला जातो. हे फोटो पाहून लोक भयंकर पद्धतीने गोंधळून जातात. असाच एक फोटो व्हायरल होतोय. या मनोरंजक ऑप्टिकल भ्रमात दडलेली गोगलगाय शोधायची आहे. खरं तर ज्या कलाकारानं हे चित्र बनवलं आहे, त्याने गोगलगाय अशा ठिकाणी लपवून ठेवली आहे की समोर बघूनही नेटकरी सहजासहजी दिसत नाहीत. गोगलगायीचा शोध घेण्यासाठी खूप डोकं लावावं लागेल. चला तर मग पाहूया की तुमची दृष्टी किती वेगवान आहे. फक्त 7 सेकंदात तुम्हाला याचं उत्तर शोधायचं आहे.

Find the snail

वर दिसणारे चित्र म्हणजे एक निर्जन डोंगराळ भाग आहे. जिथे खडकांमध्ये कुठेतरी गोगलगाय दडलेली आहे. आव्हान हे आहे की, जर तुम्हाला तो 7 सेकंदाच्या आत सापडला तर तुम्हाला प्रतिभावान म्हटले जाईल.

तसे पाहिले तर गोगलगाय शोधणे इतके सोपे नाही. हेच कारण आहे की याला ऑप्टिकल भ्रम म्हणतात.पण नीट पाहिलं तर नक्कीच दिसू शकते. मग उशीर काय झाला, शेवटी ती गोगलगाय कुठे आहे ते सांगा.

खाली आम्ही तुमच्यासाठी उत्तराचा फोटोही शेअर करत आहोत, ज्यात पांढऱ्या वर्तुळात दडलेली गोगलगाय तुम्हाला पाहता येणार आहे.

 

here is the snail