‘प्रँक’से करेंगे सबका स्वागत, दोन तरुणांचा भलताच प्रँक, Video पाहा, हसून लोटपोट व्हाल!

प्रँकच्या व्हिडीओंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दररोज नवनवे प्रँकचे व्हिडीओ (Prank Video) सोशल मीडियावर अपलोड होत असतात. बहुतेक वेळा फिरकी घेण्याच्या उद्देशाने असे व्हिडीओ बनवले जातात.

प्रँकसे करेंगे सबका स्वागत, दोन तरुणांचा भलताच प्रँक, Video पाहा, हसून लोटपोट व्हाल!
Trending video
| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 3:18 PM

मुंबई : प्रँकच्या व्हिडीओंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दररोज नवनवे प्रँकचे व्हिडीओ (Prank Video) सोशल मीडियावर अपलोड होत असतात. बहुतेक वेळा फिरकी घेण्याच्या उद्देशाने असे व्हिडीओ बनवले जातात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसूच आवरत नाही.

हा व्हिडीओ वर्दळीच्या ठिकाणचा, गर्दीचा आहे. लोक रस्त्यावर ये-जा करत आहेत. प्रत्येकजण आपापल्या धावपळीत आहेत. मात्र अशावेळी दोन तरुण तिथे येतात आणि अजब मस्करी सुरु करतात. त्यांच्या या मस्करीमुळे महिलांची मात्र तारांबळ उडाली आहे. मात्र त्यांना ही मस्करी असल्याचं समजतं तेव्हा मात्र त्या सुद्धा हसून हसून लोटपोट होतात.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

या व्हिडीओमध्ये दोन महिला चालत जात आहेत. त्याचवेळी दोन तरुण येतात. ते दोघे एकमेकांना अशापद्धतीने हातात हात देतात, जसे की त्या महिलांना वाटावं की ते आपल्यालाच स्पर्श करत आहेत. त्या तरुणांच्या या कृतीने दोन्ही महिला अचानक दचकतात. हा व्हिडीओ 5abivideos नावाच्या इन्स्टा पेजवर शेअर करण्यात आला आहे.

काही वेळातच या महिलांना समजतं की आपल्यासोबत प्रँक केलं जात आहे. त्यानंतर हे दोन्ही तरुण पुन्हा एकदा दुसऱ्या मुलींसोबत असाच प्रकार करतात.