गुजराती गरबा सोडून फाल्गुनी पाठकने धरला कोकणी गाण्यावर ठेका; Video Viral

गरबा क्वीन फाल्गुनी पाठकने गोव्यातील कार्यक्रमात ‘उंदीर मामा आयलो’ हे कोकणी गाणं गायलं. तिच्या या अनोख्या अंदाजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

गुजराती गरबा सोडून फाल्गुनी पाठकने धरला कोकणी गाण्यावर ठेका; Video Viral
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 18, 2026 | 3:48 PM

गरब्याचं गाणं म्हटलं कि आपसूकच डोक्यात फाल्गुनी पाठक येते. नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्या गरब्याच्या तालावर फाल्गुनी सर्वांना नाचायला भाग पाडते. तिने गायलेल्या गाण्यावर पाय जर थिरकले नाही तर आश्चर्यच. सध्या सगळीकडेच फाल्गुनी गरब्याची गाणी गाताना दिसत आहे. यावेळी तिने गोयेंकरांना सुद्धा आपल्या गरब्याच्या तालावर नाचवले आहे. गोव्यातला गरब्यादरम्यान तिने असं काही केलंय की तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फाल्गुनी पाठक हिची ओळख प्रामुख्याने गुजराती लोकगीतं, गरब्याची गाणी, आणि इंडीपॉप या गाण्यांमुळे ओळख आहे. त्यांच्या गाण्यांवर गरबा खेळण्यासाठी चाहते आतुरलेले असतात. महिनोनमहिने तिकिट आधीच बुक करून ठेवतात. मात्र यावेळी त्यांनी नेहमीच्या गुजराती गाण्यांपेक्षा काहीतरी आगळा वेगळा आणि भारी पर्याय निवडला आहे. गुजराती सोडून त्यांनी थेट कोंकणी गाण्यावर ठेका धरला आहे.

Loading...

फाल्गुनी पाठक हिने भर कार्यक्रमात गरब्याचे गाणे सुरू असताना अचानक उंदीर मामा आयलो हे गाणे गायला सुरूवात केली. गरब्याची धून आणि गोवेकरांचे लाडकं गाणं यामुळे गरब्याला वेगळाच जोश मिळाला. गरबा क्विनच्या आवाजात आपलं लाडकं गाणं ऐकायला मिळणं चाहत्यांसाठी खास गोष्ट ठरली. त्यामुळे या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

फाल्गुनी पाठक हिच्या चेहऱ्यावरील हावभाव, गाणं सादर करण्याची खास शैली आणि वेगळ्याच अंदाजात गाणं शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर गोवन एरा बँकर’ असं म्हणतं चाहते तिचे कौतुक करत आहेत. त्यांच्या गाण्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून गोव्यातील आणि कोकणी भाषिक चाहत्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us