Viral Video : फाटलेली चप्पल, शिवलेला ड्रेस, तरी शाळा शिकण्यासाठी मुलीची धडपड, चिमुकलीची जिद्द पाहून अभिमान वाटेल; VIDEO ची तुफान चर्चा!

फाटकी चप्पल, पण शिक्षणाची पक्की ओढ; सोशल मीडियावर चिमुरडीच्या संघर्षाचा व्हिडिओ व्हायरल. ना परिस्थितीची तक्रार, ना हट्ट; पायात शिवलेली चप्पल घालून शाळेत जाणाऱ्या मुलीने जिंकली नेटीझन्सची मने, कठीण परिस्थितीवर मात करणारी 'ती'ची धगधगती जिद्द; नेटीझन्सकडून कौतुकाचा वर्षाव

Viral Video : फाटलेली चप्पल, शिवलेला ड्रेस, तरी शाळा शिकण्यासाठी मुलीची धडपड, चिमुकलीची जिद्द पाहून अभिमान वाटेल; VIDEO ची तुफान चर्चा!
viral video
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 25, 2026 | 3:14 PM

काही लेकारांच्या आयुष्यात लहान वयातच इतका संघर्ष असतो की त्यांच संपूर्ण बालपण परिस्थितीशी झगडण्यात, दोन हात करण्यातच जातो. पुढारलेल्या समाजात हीच गरीबी कोणाला शाळेची बॅग सोडून प्लॅस्टिकची पिशवी घ्यायला लावतं तर कोणाला शाळेच्या वाटेवर अनवाणी चालवायला भाग पाडतं. अशा परिस्थितीला काहीशी मुलं कंटाळतात, शाळा सोडण्याचा विचार करतात, मला हे हवंच तरंच मी शाळेत जाईन नाहीतर नाही जाणार असा हट्ट धरतात. स्वच्छ सुंदर समाजात वावरताना आपण फाटलेले आहोत या विचाराने काही अंशी त्यांचा तो हट्ट योग्यही असतो म्हणा. पण त्याच समाजात अशी काही मुलं असतात, जी परिस्थिती बदलणयाची धमक ठेवतात. उरात जिद्द बाळगतात. असाच एक सुंदर धगधगणाऱ्या जिद्दीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रत्येकाच्या मनाला त्या मुलीची जिद्द भिडली आहे.

या व्हिडिओनुसार हा प्रसंग कदाचित शाळा भरण्यापूर्वीचा आहे. शाळा भरण्याच्या आधी प्राथर्ननेसाठी मुलं रांगते उभी आहेत. मुलांची वेगळी रांग आणि मुलीची वेगळी रांग लागली आहे. मुलं कदाचित काही प्रार्थना म्हणत आहेत. तितक्यात कॅमेऱ्याची नजर त्या रांगेत उभ्या असणाऱ्या मुलीकडे जाते. तिच्या घनदाट लांब केस त्यांच्या घातलेल्या दोन वेण्या सर्वांच लक्ष वेधून घेतात. पण नंतर नजर जाते ती पायाकडे, त्या मुलीच्या पायात स्लीपर आहे. एक स्लीपर चांगली तर दुसरी फाटलेली आहे. फाटलेली चप्पल वरच्या बाजूने शिवलेली दिसत आहे. फाटलेली चप्पल असूनही शाळेत येण्याची ही या मुलीची जिद्द निशब्द करणारी आहे.

Loading...

 

 

 

हा व्हिडिओ @tr_sachin_sir123 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे शिक्षक आहेत. हे सचिन सर खेड्यापाड्यातील मुलांना शिकवतात. त्यांचे अनेक व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यातील हा एक व्हिडिओ. या मुलीच्या व्हिडिओमधून शिक्षणाची ओढ काय चिझ आहे किती मोठी आहे याची जाणीव होते. मात्र तिचं नाव, गाव, शाळा याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या मुलीची जिद्द आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवते. परिस्थिती कठीण असली, तरी स्वप्न पाहणं कधीच थांबवायचं नसतं. पायातली चप्पल शिवून पुन्हा शाळेची वाट धरणाऱ्या अशा लेकरांनी फक्त कौतुकाची थापच नव्हे तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी आधारही मिळायला हवा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us