अगोदरच 9 मुलं, 3 पती, चौथ्या अफेअरला नकार दिला म्हणून नवऱ्यासोबत विचित्र कृत्य; तुम्हीही चकित व्हाल!
उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये एका व्यक्तीला त्याच्याच पत्नीने खोलीत कोंडून अर्धे केस आणि मिशी कापल्याचा तसेच गळ्यात चपलांचा हार घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

उत्तर प्रदेशच्या हरदोई गावातून हैरान करणारी घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणाला नकार दिल्याने एक महिलेने चक्क आपल्यासोबत असे काही केले ज्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. महिलेचे याआधी दोन पुरुषांशी लग्न झाले होते. त्यापासून तिला एकूण ९ मुले होती. तिसऱ्या पुरूषाशी लग्न झाल्यानंतर तिचे चौथ्या पुरूषासोबत अफेअर सुरू झाले.या प्रकरणाला तिसऱ्या पतीने नकार दिला असता प्रियकराच्या मदतीने तिने पतीचे केस कापले आणि चपलांचा हार घातला. या घटनेनंतर पोलिस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत.
ही घटना उत्तर प्रदेशच्या हरदोईच्या खुर्रमपुरवा गावात घडली आहे. गावात राहणाऱ्या सोनिया यादव या महिलेचे ३ वेळा लग्न झाले होते. तिला एकूण ९ मुले होती. नरेंद्र आणि सोनिया या दोघांची ओळख वर्षभरापूर्वी इंस्टाग्राम झाली होती. त्यातूनच मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. घरच्यांच्याविरोधात जाऊन नरेंद्रने सोनियाशी लग्न केलं. लग्नाला फक्त १ वर्ष झालं असतानाच सोनियाचे चौथ्या पुरूषाशी अफेअर सुरू झाले. याचदरम्यान चौथ्या पुरूषापासून गरोदर देखील राहिली होती.
नरेंद्रला सोनियाविषयी संशय आल्याने त्याने तिचा फोन चेक केला. चॅटिंग वाचल्यावर तिचे परपुरूषाशी संबंध असल्याचे नरेंद्रला कळले. त्यामुळे त्या दोघांच्यात प्रचंड भांडणे होऊ लागली.नरेंद्र तिच्या प्रेमप्रकरणाच्या विरोधात होता. त्याचा रागाच्या भरात सोनियाने नरेंद्ला अद्दल घडवण्याचे ठरवले. आपल्या प्रियकरासोबत मिळून तिने नरेंद्रला एका ठिकाणी बोलावले. प्रियकराच्या घरातच त्याला काही काळ कोंडून ठेवले. त्याच सोबत त्याचा प्रचंड छळ केला. त्याचे अर्धटक्कल केलं, अर्धी मिशी कापली आणि चपलांचा हार देखील घातला. याच परिस्थितीत त्याला अनेक दिवस कोंडूनही ठेवले गेले होते. त्याचा व्हिडिओ शूट करत सोशल मीडियावर अपलोडही केला.
व्हायरल झालेला व्हिडिओ पोलिसाना मिळताच त्यांनी तातडीने तपास सुरू केला आहे. हरपालपूरच्या क्षेत्रअधिकारी यांनी स्पष्ट केले आहे कि महिला फरार झाली असून पोलिस तिचा लवकरात लवकर शोध घेतील.