Jantar Mantar protests : जंतर- मंतरच्या प्रोटेस्टवर या पठ्ठ्याने बनवला व्हिडिओ गेम; जंतर- मंतर चलो…सोशल मीडियावर झाला व्हायरल

जंतर- मंतर सध्या आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला आहे. सीजेपी सध्या जंतर मंतर सारख्या ठिकाणी आंदोलनाच्या तयारीत आहे आणि दिल्ली पोलीस गर्दी पांगवत बसले आहेत. हीच सर्व परिस्थिती बघून एका मुलाला भन्नाट कल्पना सुचली आणि त्याने जंतर - मंतर चलो या नावाने एक भन्नाट गेमच काढलाय.

Jantar Mantar protests :  जंतर- मंतरच्या प्रोटेस्टवर या पठ्ठ्याने बनवला व्हिडिओ गेम; जंतर- मंतर चलो...सोशल मीडियावर झाला व्हायरल
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 17, 2026 | 4:31 PM

गेम खेळायचा म्हटलं की रेस, मारामारी किंवा मिशन पूर्ण करणं हे सगळं डोळ्यासमोरं येतं.पण एका पठ्याने दिल्लीतील आंदोलनाच जंतर मंतर वरचं गेम तयार केलायं. जंतर मंतर वर घडणारे प्रसंग, घटना त्यांना अगदी सेम टू सेम पद्धतीने या पठ्ठ्याने गेममध्ये आणल्या आहेत. यात तुम्ही आंदोलक बनू शकता किंवा दिल्ली पोलीस बनून आंदोलकांना रोखूही शकता.यात अगदी झोमॅटो वाल्याचाही समावेश आहे. हा गेम सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

Loading...

गेम सुरू झाल्यावर तुम्हाला दोन पर्याय मिळतात. एक आंदोलक बनायचं आणि दुसरा म्हणजे दिल्ली पोलीस बनायचे. आंदोलक बनून लोकांना आपल्यात सामील करून घ्यायचे.गर्दी वाढवायची आणि पोलीसांना चकवा देत जंतर मंतर पर्यंत पोहोचायचं. गर्दी कमी पडली तर पोलीस तुम्हाला पकडणार. पोलीस बनलात तर आंदोलकांना रोखायचं, त्यांना पुढे जाण्यापासून थांबवायचं. गर्दी पांगवायची.

 

 

 

 

म्हणजे गेम खेळताना जंतर- मंतरपर्यंत पोहोचणंही काही सोपं काम नाही. प्रत्यक्ष आंदोलनात लोकांना ज्या अडचणींचता सामना करावा लागतो. त्यांची सेम टू सेम झलक या गेममध्ये दाखवण्यात आली आहे.,

उत्तर प्रदेशातील बरेलीचा 27 वर्षीय सूरज कुशवाह याने हा गेम तयार केला आहे. तो आयटी क्षेत्रात काम करतो. अलीकडच्या काळातील हे जंतर मंतर वरील आंदोलनावरून त्याला या गेमची आयडिया सूचली. हा गेम बनवण्यासाठी त्याने AI ची मदत घेतली. त्याने या गेमचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो काही मिनिटांतच
व्हायरल झाला

नेटकरी म्हणाले हा तर GTA -6 पेक्षा…

गेम व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलंय की GTA -6 येण्याआधीच आपल्याला जंतर मंतर च्या आंदोलनाचा सिम्युलेटर मिळाला आहे. तर काहींना या आयडियाचं कौतुक केलं आहे. तर काहींनी गेममध्ये आणखी पर्यायही सूचवले आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us