Kanyakumari YouTuber : सोशल मीडियावर सोनं अन् पैसे केले फ्लाँट; YouTuberच्या घरातून 1 कोटींचा ऐवज चोरीला

कन्याकुमारीतील YouTuber दाम्पत्याच्या घरातून 118 सोव्हरेन म्हणजे सुमारे 944 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Kanyakumari YouTuber : सोशल मीडियावर सोनं अन् पैसे केले फ्लाँट; YouTuberच्या घरातून 1 कोटींचा ऐवज चोरीला
VIRAL VIDEO
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2026 | 7:58 PM

सोशल मीडियावर लोक प्रसिद्ध होण्यासाठी लोक काय करतात.. कुणी भन्नाट व्हिडिओ बनवतं, कुणी महागड्या गाड्या दाखवत, तर कुणी चक्क घरातलं सोनं आणि पैसाही रीलमध्ये फ्लाँट करतं. पण हेच सोनं आणि पैसे दाखवणं एका युट्युबरला चांगलचं महागात पडलं आहे. कारण रीलमध्ये सोनं- पैसे दाखवल्यानंतर काही दिवसांतच तिच्या घरातून तब्बल १ कोटी रूपयांचे सोने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. आता या चोरीमागे सोशल मीडियाचं काही कनेक्शन आहे का याचा तपास सुरू आहे.

ही घटना कन्याकुमारी जिल्ह्यातील थम्माथुकोनम येथील VIP GARDEN परिसरात घडली. युट्यूबर मधूमिता आणि त्यांचे पती विनोद कुमार राहत असल्याची माहिती आहे. गुरूवारी संध्याकाळी हे कुटुंब शॉपिंगसाठी बाहेर गेले असतानाच या घरात चोरी झाली. रात्री घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

मागच्या दरवाज्यातून चोरांचा प्रवेश

चोरांनी घराच्या मागच्या बाजूचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. घरातील कपाटामध्ये ठेवलेले दागिने गायब झाल्याचं आढळलं. त्यानंतर कुटुंबाने राजक्कमंगलम पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

 

 

 

 

 

 

रीलमध्ये श्रीमंतीचा दिखावा

हे कपल प्रचंड श्रीमंत असल्याचं त्यांच्या रिल्समधून स्पष्ट होतय. रिल्स करताना कायम कंटेटमध्ये मधुमिता सोन्याचे दागिने, पैसे, पैशांचा वर्षाव, रोख रक्कम,श्रीमंत जीवनशैली वारंवार दाखवायची. असे श्रीमंतीचे व्हिडिओ दाखवूनच मधूमिताला रिल्सवर प्रचंड व्हूज्स मिळत होते. व्हिडिओ ट्रेन्ड होत होते. त्यामुळेच पैसे चोरीला गेले असण्याची शक्यता आहे.

पैसे आणि श्रीमंती आहे म्हणून सोशल मीडियावर ते जाहीरपणे दाखवायची गरज नसते. केवळ व्ह्यूज मिळवण्याच्या नादात दागिने दाखवणं गरजेचं नाही. रिलमध्ये श्रीमंती दाखवून काही वेळ व्ह्यूज आणि लाईक्स मिळतील,पण त्यातून धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियावर काय दाखवायचं आणि काय नाही याची अक्कल प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे. शेवटी पैसा कमावणं महत्त्वाचं आहेच,पण ते सुरक्षित ठेवण्याची अक्कल असणं त्याहूनही महत्त्वाचं

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us