Viral Video : बाईक की मालवाहू गाडी? 5 मुलांना लोखंडी बास्केटमध्ये कोंबून बाईक सुसाट

कर्नाटकातील एका व्हायरल व्हिडिओमध्ये चालकाच्या पुढे एक आणि मागच्या लोखंडी बास्केटमध्ये पाच मुलं बसलेली दिसत आहेत. म्हैसूर–नंजनगुड रोडवरील असल्याचा दावा असलेल्या या व्हिडिओने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे.

Viral Video : बाईक की मालवाहू गाडी? 5 मुलांना लोखंडी बास्केटमध्ये कोंबून बाईक सुसाट
BIKE VIRAL VIDEO
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 23, 2026 | 6:42 PM

बाईकवर बसण्याची जागा ही कमीत कमी दोन लोकांची असते फार फार तर तीन लोक बसवली जातात. पण या महाशयांनी थेट सात मुलांना बाईकवर बसवलंय. छे छे कोंबलंय बाईकवर जागा कमी पडली म्हणून चक्क मागे बॉक्ससारखी मोठी लोखंडी जाळी बसवली.त्यात 1, 2 नव्हे तर तब्बल 5 मुलांना बसवून प्रवास करण्यात आला. म्हणजेच दुचाकीवर तब्बल 7 जण प्रवास करत होते. हा प्रकार पाहून बाईक आहे कि मिनीस्कूलबस असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

कर्नाटकातील मैसूर – नंजनगड रोडवरील असल्याचा दावा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती TVS XL मोपेड चालवताना दिसतो. त्याच्य वाहनाच्या मागच्या बाजूला लोखंडी जाळीचा मोठा पिंजण्यासारखा बॉक्स तयार करण्यात आला आहे. या बॉक्समध्ये पाच मुलं बसलेली दिसतात, तर एक मूल चालकाच्या पुढे बसलेलं आहे.

साहेबांनी स्वत:च्या सुरक्षेची घेतली पुरेपुर काळजी मग मुलांच काय

या संपूर्ण प्रकारात आणखी एक गोष्ट लक्ष वेधून घेते. बाईक चालवणाऱ्या व्यक्तीने स्वत:हेल्मेट घातलेलं दिसत आहे. मात्र या लोखंडी बॉक्समधल्या मुलांना वाऱ्यावरचं सोडलंय. मुलं ज्याप्रकारे त्या अरूंद लोखंडी जाळीत बसली आहेत त्यात वाहनाचा अचानक ब्रेक लागला, किंवा तोल गेला किंवा दुसऱ्या वाहनाची धडक बसली तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

 

 

रस्ता देखील खतरनाक आणि खड्ड्यांनी भरलेला

व्हायरल पोस्टनुसार हा व्हिडिओ म्हैसूर – नंजनगुड रोडवर रेकॉर्ड करण्यात आला आहे.हा मार्ग ऊटीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांपैकी एक असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. बाईक चालवत असलेल्या रस्त्यावर प्रचंड गर्दी देखील दिसत आहे. त्यामुळे या परिस्थितीत असा प्रवास करणे म्हणजे धडकी भरवणारेच आहे.

बाईक की मालवाहू बाईक? म्हणत नेटकरी संतापले

व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर नेटकऱ्यांनी या प्रकारावर जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. मुलांच्या जीवाशी अशा प्रकारे खेळणे योग्य नसल्याचे म्हटलंय. तर काहींनी हा वाहतूक नियमांचा सरळ सरळ भंग असल्याचे जाहीर केले आहे. काहींनी संबधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिडिओ पाहून सुरूवातीला हा प्रकार एखादा मजेशीर जुगाड वाटू शकतो. पण मुलांना लोखंडी बॉक्समध्ये बसवून दुचाकीवरून अशा पद्धतीने प्रवास करणं त्यांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरू शकतो.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us