Viral : अशीही प्रेमकहाणी! भारताची बियांका मायली आणि पाकिस्तानची सायमा अहमदी यांची लव्हस्टोरी; फोटो व्हायरल

| Updated on: Jul 20, 2022 | 7:29 PM

लग्नाच्या दिवशी लग्नाची मिरवणूकही आली. तिथे दोन्ही बाजूची कुटुंबे भेटली आणि गाताना आणि नाचताना दिसली. शेवटी, बियांका आणि सायमा यांनी एकमेकांना अंगठी दिली आणि दोघींनी अधिकृतपणे लग्न केले.

Viral : अशीही प्रेमकहाणी! भारताची बियांका मायली आणि पाकिस्तानची सायमा अहमदी यांची लव्हस्टोरी; फोटो व्हायरल
बियांका मायली आणि सायमा अहमदी
Image Credit source: Insta
Follow us on

नवी दिल्ली : भारताची राहिवासी असणारी बियांका मायली (Bianca Maieli) आणि पाकिस्तानची सायमा अहमदी यांची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी बियांकाने सायमासोबतचा तिचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर लोक त्यांना एक अनोखे जोडपे म्हणू लागले होते. बियांकाने 2019मध्ये तिची समलिंगी (Lesbian) जोडीदार सायमा अहमदीशी अमेरिकेत लग्न केले. बियांका मायली ख्रिश्चन आहे, तर तिची जोडीदार सायमा मुस्लीम आहे. बियांका ही कोलंबियन-भारतीय आहे. अमेरिकेत एका कार्यक्रमादरम्यान तिची सायमाशी (Saima Ahmad) भेट झाली. 2014मध्ये पहिल्या भेटीनंतर, बियांका आणि सायमा यांनी एकमेकांना जवळपास 5 वर्षे डेट केले. त्यानंतर 2019मध्ये दोघांनी कॅलिफोर्नियामध्ये लग्न केले. बियांका आणि सायमाच्या लग्नसोहळ्याचे (Marriage photos) फोटोदेखील व्हायरल झाले होते.

लग्नाच्या दिवशी कसा होता उत्साह?

या दोघांच्या ड्रेसचेही खूप कौतुक झाले. लग्नात बियांका हस्तिदंती रंगाच्या साडीत दिसली होती. तिचा सोन्याच्या बांगड्या, आकर्षक पोषाख तसेच अलंकार घातलेला लूक सर्वांना भावला होता. त्याचवेळी सायमाने या खास प्रसंगी काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. लग्नाच्या दिवशी लग्नाची मिरवणूकही आली. तिथे दोन्ही बाजूची कुटुंबे भेटली आणि गाताना आणि नाचताना दिसली. शेवटी, बियांका आणि सायमा यांनी एकमेकांना अंगठी दिली आणि दोघींनी अधिकृतपणे लग्न केले.

पारंपरिक ड्रेसमध्ये खुलून दिसत होते सौंदर्य

याआधी मेहंदीच्या वेळीही हे कपल पारंपरिक ड्रेसमध्ये दिसले होते. बियांकाने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता. त्याचवेळी सायमा कुर्ता पायजमामध्ये दिसली. बियांका आणि सायमा सोशल मीडियावर खूप फेमस झाल्या आहेत. त्याच्या फोटोंवर हजारो लोक कमेंट आणि लाइक करतात. काही जण या प्रेमकथेवर लिहिलात, शेवटी प्रेम जिंकते. तर काही लोक म्हणतात, प्रेमाला सीमा नसते.