Video Viral : पुराच्या पाण्यात दारूच्या बाटल्या तरंगताना दिसल्या; पकडण्यासाठी लोकांची धावपळ, सोशल मीडियावर भन्नाट कमेंट्स

पुराच्या जोरदार प्रवाहात दारूच्या बाटल्या तरंगताना दिसल्यानंतर काही लोक त्या पकडण्यासाठी पुढे गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video Viral :  पुराच्या पाण्यात दारूच्या बाटल्या तरंगताना दिसल्या; पकडण्यासाठी लोकांची धावपळ, सोशल मीडियावर भन्नाट कमेंट्स
video viral
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 27, 2026 | 10:07 PM

पुराचं पाणी घरात शिरलं कि माणूस आधी भाकरी, पाणी कपडे आणि घरातील महत्त्वाची वस्तू वाचवायला बघतो. पण इथं तर लोकांना पाण्यात चक्क दारूच्या बाटल्य वाहून आल्या मग काय पुराचं पाणी कमी आणि बाटल्या पकडण्याचीच धावपळ जास्त दिसायला लागली… मग आता जीव महत्त्वाचा कि दारू ते आता समजून जा..सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पुराच्या पाण्यात दारूच्या बाटल्या तरंगताना दिसतात. त्या पकडण्यासाठी काही जण पाण्यात उतरताना किंवा त्या पकडताना दिसत आहेत.

 

पुराच्या पाण्यात चक्क दारूच्या बाटल्या

व्हायरल व्हिडिओमध्ये जोरदार पाण्याचा प्रवाह दिसत आहे. याच पाण्यात दारूच्या अनेक बाटल्या तरंगताना दिसतात. बाटल्या नजरेस पडताच काही लोक त्या पकडण्यासाठी पुढे जाताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आपलं महत्त्वाचं सामानच वाहून जातंय. या प्रकारे लोक त्या बाटल्या वाचवण्यासाठी पुराच्या पाण्यात उतरत आहेत.

 

 

 

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीही या घटनेची मजा घेतली आहे. काही यूजर्सनी बाटल्यांना परफेक्ट औषध म्हटलंय तर काहीनी पुरग्रस्तांना मदत म्हणून अन्न पाणी हवं असतं पण इथे काहीतरी भलतंच चाललंय अशा मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

 

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुराच्या परिस्थितीतील हा वेगळाच नजारा असल्याने व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. पाण्याच्या प्रवाहात बाटल्या तरंगताना आणि त्या मिळवण्यासाठी लोक धडपडताना दिसल्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us