आईंग…हे काय! भावाला दफन करण्यापूर्वी शवपेटी उघडली, कान कापला अन्… कारण ऐकून पोलीसही हैराण

| Updated on: Mar 27, 2024 | 3:07 PM

भावाचं निधन, अंत्यसंस्कार करण्यापूर्वी उघडली शवपेटी, कापला कान... पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर... धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र खळबळ... जाणून तुम्हालाही बसेल धक्का... कुठे आणि कशी घडली घटना? भावानेच का केला भावाचा घात?

आईंग...हे काय! भावाला दफन करण्यापूर्वी शवपेटी उघडली, कान कापला अन्... कारण ऐकून पोलीसही हैराण
Follow us on

दोन भावांमध्ये होणारी भांडणं तु्म्ही पाहिली असतील, ऐकली असतील… पण आता जी घटना समोर येत आहे ती अत्यंत हृदयद्रावक आहे. एका व्यक्तीने स्वतःच्या भावाच्या मृतदेहासोबत जे काही केलं ते अत्यंत हैराण करणारं आहे. भावाचे अंतिमसंस्कार होण्यापूर्वी व्यक्तीने भावाने कान कापून स्वतःकडे ठेवले. कान लपवले असले तरी आरोपी पोलिसांच्या कचाट्यातून सुटला नाही. घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी आरोपीला अटक केली. आरोपीने असं का केलं? याचं कारण पोलिसांना कळल्यानंतर त्यांना देखील मोठा धक्का बसला.

रिपोर्टनुसार, संबंधीत घटना ऑस्ट्रेलिया येथील सिडनी येथे घडली आहे. आरोपीचं नाव Jian Zhong Li असं आहे. त्याच्यावर मृतदेहाची छेडछाड केल्याचे आरोप आहेत. आरोपीने मृतदेह पुरण्यापूर्वी शवपेटी उघडली आणि मृत भावाचे कान कापले. ही घटना 4 मार्च 2022 मध्ये घडलेली आहे. पण दोन वर्षांनंतर आता आरोपीने कृत्याची कबुली दिली आहे.

पोलिसांच्या चौकशीत जे काही समोर आलं ते अत्यंत भयानक आहे. आपल्या भावाचा मुलगा अनैतिक संबंधातून जन्माला आला आहे… असं आरोपीला वाटतं होतं. हेच सत्य समोर आणण्यासाठी आरोपीकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता. म्हणून डीएनए नमुणे असायला हवेत म्हणून आरोपीने भावाच्या निधनानंतर कान कापून स्वतःकडे पुरावा म्हणून ठेवले.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या भावाचा वयाच्या 58 व्या वर्षी फुफ्फुसाच्या गंभीर आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला. वास्तविक हे प्रकरण मालमत्तेशी संबंधित असल्याची माहिती देखील समोर आली आहे. आरोपीच्या भावाकडे गडगंज संपत्ती होती. यामध्ये सिडनीतील एक मिलियन डॉलरच्या घराचाही समावेश आहे.

पण भावाने मृत्यूपूर्वी कोणतेही मृत्युपत्र सोडलं नव्हतं. आरोपी म्हणतो, भाचा चेंग याची (मृतभावाचा मुलगा) डीएनए चाचणी करवून घ्यायची होती, त्यामुळे त्याला नमुना म्हणून त्याचे कान कापावे लागले. भावाच्या वारसाची खरी मालक त्याची 91 वर्षांची आई आहे. कारण, त्यांची राहण्याची जागा चांगली नाही. त्याचबरोबर त्यांच्या देखभालीसाठीही काही मिळायला हवे.’

असा झाला खुलासा…

तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, अरोपीने गुपचूप कान कापले तरी देखील सर्वांना कसं कळलं? कानाचा तुकडा त्याच्या भावाचा आहे हे सिद्ध करण्यासाठी, अंत्यसंस्कार करणाऱ्या लोकांकडून स्वाक्षरी करणे आवश्यक होतं. मात्र अधिकाऱ्यांनी तसे करण्यास नकार देत मृताच्या कुटुंबीयांना माहिती दिली.

घडलेल्या घटनेची माहिती त्यानंतर पोलिसांपर्यंत पोहोचली. अखेर पोलिसांनी छापा टाकून आरोपीच्या घरातून कानाचा तुकडा जप्त केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. हे देखील सिद्ध झाले की, चेंग हा आरोपीच्या मृत भावाचा कायदेशीर मुलगा होता. आरोपीला फक्त मालमत्ता हडपायची होती. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.