या गावात नवरात्रीत पुरूष साडी नेसून करतात गरबा, 200 वर्षापासून सुरू असलेली थक्क करणारी परंपरा

नवरात्रीत सगळीकडे रंगीबेरंगी कपड्याची धूम असते. तरूण तरूणींमध्ये नवरात्रीचा भरपूर उत्साह भरलेला असतो. देवीचे उपवास, आराधना आणि गरबा यात प्रत्येत जण रमलेला असतो. पण अशा एका गावात पुरूषचं साडी नेसून गरबा खेळतात.

या गावात नवरात्रीत पुरूष साडी नेसून करतात गरबा, 200 वर्षापासून सुरू असलेली थक्क करणारी परंपरा
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 19, 2026 | 4:35 PM

नवरात्री आली कि गरबा, दांडिया आणि रंगीबेरंगी कपड्यांची धूम सूरू होते. गुजरातमध्ये तर या नवरात्रीचा उत्साहच वेगळा असतो. चनियाचोळी,केडियू वेगवेगळ्या रंगाच्या टोपी या सगळ्यामुळे वातावरण एकदम रंगीबेरंगी होऊन जातं.पण गुजरातमध्ये अशी एक परंपरा आहे. जिथं नवरात्रीच्या आठव्या रात्री पुरूष चक्क साडी नेसून गरबा करतात. आता पुरूषांनी नवरात्रीचे कपडे सोडून बायकांची साडी का नेसतात. असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर यामागे 200 वर्षापूर्वीची परंपरा आहे जी आजही गुजरातमधील लोक साजरी करत आहेत.

या परंपरेमागे एका सदुबेन नावाच्या महिलेची कहाणी सांगितली जाते. साधारण 200 वर्षापू्र्वी सदुबेन यांच्यावर संकट आलं होतं. मुघल सरदारापासून संरक्षण मिळावं यासाठी त्यांनी आपल्या समाजातील पुरूषांकडे मदत मागितली होती.मात्र त्यांना अपेक्षित मदत मिळाली नाही. या घटनेनंतर सदुबेन यांचं आयुष्य दु:खदरित्या संपल्याचं सांगितलं जातं.

Loading...

समाजातील पुरूषांनी संकटाच्या वेळी साथ न दिल्यामुळे सदुबेन यांनी शाप दिल्याचीही लोकमान्यता आहे. त्यानंतर त्यांना साडू माता म्हणून मान दिला जाऊ लागला. आपल्या पूर्वजांकडून घडलेल्या चुकीबद्दल पश्चात्ताप व्यक्त करण्यासाठी आणि साडू मातेची श्रद्धेने पूजा करण्यासाठी पुरूषांनी साडी नेसून गरबा करण्याची परंपरा सुरू केल्याचं सांगितलं जातं.

आजही नवरात्रीच्या आठव्या रात्री या परिसरात पुरूष साडी नेसून, पारंपरिक पद्धतीने सजून गरबा करतात. आजच्या काळात गरबा म्हटलं की आपल्याला डीजे, मोठे मंडप आणि रंगीबेरंगी कपडे आठवतात. पण अहमदाबादमध्ये आजही एका जुन्या घटनेची आठवण जपत पुरूष साडी नेसून गरबा करतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us