जगातली सर्वात Hottest Mechanic? काय केलाय दावा? घायाळ करणारे Photos होताहेत Viral, पाहा…

| Updated on: Mar 08, 2022 | 2:45 PM

Hottest mechanic : टँटिन लेगॅस्पी मेनेसिस (Tantin Legaspi) ही महिला एक कार मेकॅनिक (Mechanic) आहे आणि मॉडेलदेखील (Model)... जगातली सर्वात सुंदर मेकॅनिक असल्याचा दावा ती करते. ती 10 वर्षांपासून मेकॅनिक म्हणून काम करत आहे.

जगातली सर्वात Hottest Mechanic? काय केलाय दावा? घायाळ करणारे Photos होताहेत Viral, पाहा...
हॉटेस्ट मेकॅनिक असल्याला दावा करणारी टँटिन लेगॅस्पी
Image Credit source: Instagram
Follow us on

Hottest mechanic : एखादा मेकॅनिक आठवला, की मळकट कपडे आणि अंग काळवंडलेले असे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. पण कधी एखादा मेकॅनिक मॉडेल असू शकतो, हा विचार केलाय का कधी? त्यातही ती व्यक्ती महिला असेल तर? टँटिन लेगॅस्पी मेनेसिस (Tantin Legaspi) ही महिला एक कार मेकॅनिक (Mechanic) आहे आणि मॉडेलदेखील (Model)… जगातली सर्वात सुंदर मेकॅनिक असल्याचा दावा ती करते. कारच्या सर्व्हिसदरम्यान अनेक लोक तिला बाहेर भेटायलाही सांगतात. मात्र त्यांना पुन्हा पुन्हा नकार द्यावा लागतो. टँटिन मॉडेलिंगमध्येही खूप लोकप्रिय आहे. ती फिलीपिन्सची रहिवासी आहे आणि स्वतःचे वर्णन ‘प्राउड फिलिपिना ब्युटी’ असे करते. विशेष म्हणजे ती 10 वर्षांपासून मेकॅनिक म्हणून काम करत आहे. टँटिनने वयाच्या 15व्या वर्षी हे काम सुरू केले. आणि आता ती 26 वर्षांची आहे. टँटिन म्हणते, की तिला पुरुषांच्या लैंगिक टिप्पण्यांची पर्वा नाही. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करते.

दुर्लक्ष करायला शिकले

मला एकटे काम करायला आवडते. कारण पुरुषांकडे बघताना मला अस्वस्थ वाटते. टँटिन सांगते, की जे लोक मला इथे काम करताना दिसतात, ते मला प्रश्न विचारतात आणि मग बोलायला सुरुवात करतात. माझे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यावर माझे लक्ष असते. आता मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकले आहे. टँटिन पुढे म्हणते, की मी हा व्यवसाय पुरुषांचे लक्ष वेधण्यासाठी निवडलेला नाही किंवा एखाद्याला प्रभावित करण्यासाठी नाही. हे काम मी स्वतःसाठी करते.

टँटिन लेगॅस्पी

ऑटोमोटिव्ह कोर्सला प्रवेश

माझ्याबद्दल कोण काय विचार करेल, याची मला पर्वा नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच उत्तम उपाय आहे. मी लैंगिकतावादी टिप्पण्यांचा माझ्यावर परिणाम होऊ देत नाही. जेव्हा ती हायस्कूलमध्ये होती तेव्हा तिने मेकॅनिक बनण्याचा विचार केला. पण या व्यवसायात पुरुषांचे वर्चस्व आहे. म्हणूनच तिच्या शिक्षकांना तिने हे करावे असे वाटत नव्हते. असे असूनही टँटिनने ऑटोमोटिव्ह कोर्सला प्रवेश घेतला आणि आता ती तिच्या दुकानात काम करते. तिला लहानपणापासूनच अशा कामाची आवड होती.

आणखी वाचा :

‘…तर सरकारी नोकरी गेलीच म्हणून समज’, असं काय म्हणाला नवरदेव म्हणून लोक संतापले? Video viral

#IWD2022 : आंतरराष्ट्रीय महिला दिनी यशस्वी व्यक्तींनी महिलांविषयी ‘असा’ व्यक्त केला आदर

आता काम आधार देण्याचं…; पोलंडमधल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ हृदयद्रावक Photo पाहिला का?