Viral Video : माकड आलं, थेट मिठी मारली दुकानादाराला दिलेल्या ‘जादूच्या झप्पीची’ सोशल मीडियावर चर्चा
नासधुस करायला आलेल्या माकडाने दुकानदाराला मारली थेट 'जादूची झप्पी'; सीसीटीव्ही व्हिडिओ तुफान व्हायरल. एकाला दिली प्रेमाची मिठी तर दुसऱ्याची उडाली घाबरगुंड. माकडाचा व्हिडिओ सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद

माकड दुकानात शिरला कि वस्तूंची वाट लागलीच समजायची, पण एका माकडाने असा काही प्रताप केलाय कि नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच आहे.पण त्याशिवाय हसून हसून लोटपोटही व्हायला झालं आहे. मोबाईलच्या दुकानात शिरलेल्या त्या माकडाने दुकानदाराला थेट जादूची झप्पीचं दिली आहे. अशी मिठी मारली कि त्याचा व्हिडिओ काही सेकंदातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक माकडं मोबाईलच्या दुकानात शिरताना दिसत आहे. दुकानात दोघं जण काम करताना दिसत आहे. त्यातील एक माणूस गल्लाजवळ बसला आहे. समोरच्या रस्त्यावरून एक माकड या दुकानात शिरतो. दोघांना आधी वाटलं की हा माकड आता नुकसान करूनच जाणार, पण थांबा हा माकड अचानक त्या गल्ल्याजवळ बसलेल्या मुलाच्याजवळ जातो आणि थेट त्याला मिठीचं मारतो. तो मुलगाही माकडाला न हाकलता मिठी मारू देतोय, जसं काही रोजचा भेटणारा मित्रचं. पण हे सगळं चित्र बघून त्या दुकानात असणाऱ्या त्या दुसऱ्या मुलाची चांगलीच घाबरगुंडी उडालेली दिसतं आहे.हा सगळा प्रकार दुकानात असलेल्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. परंतु हा व्हिडिओ कुठला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेला नाही.
नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
माकडाचा असा अंदाज कोणी बघण्याची शक्यता फार कमी असते. माकड सहसा मानवी वस्तीत घुसत नाही आणि घुसलेच तर नासधुस केल्याशिवाय सोडत नाही. त्यामुळे हे प्रेम करणारे माकड पाहायला मिळाल्याने नेटकऱ्यांमध्ये याची जोरदार चर्चा रंगली आहे. कोणी म्हणतंय हा माकड दुकानदाराला आधीापासून ओळखत असावा, तर कोणी म्हणतंय तो मोबाईल घेण्यासाठी आला आहे. पण त्याच्या या अनपेक्षित कृतीमुळे व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला आश्चर्य वाटत आहे.
एकंदरीत काय तर दुकानात आलेल्या या माकडाने दुकानदाराला मिठी मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांच लक्ष वेधून घेत आहे. आता सांगा राव असाच प्रसंग तुमच्यासोबत घडला तर? दिसला बाबा एखाद्या माकडाला तुमच्यात त्याचा मित्र आणि त्याने मिठी मारली तर? तुम्ही काय कराल?