MS Dhoni : कायम सिरीयस असणार्‍या धोनीचा रोमँटिक अंदाज, पत्नीसोबत केलं असं काही….. VIDEO VIRAL

क्रिकेटच्या मैदानावर शांत राहणारा, कॅप्टन कुल एका वेगळ्याचं अंदाजात पाहायला मिळालं. आपल्या पत्नीसोबत त्याने असं काही केलंय की त्याचा थेट व्हिडिओच व्हायरल झाला आहे. पण मैदानाच्या बाहेर असताना धोनीच्या वागण्याचा या रोमँटिक अंदाजाने चाहते भारावून गेले आहेत.

MS Dhoni :  कायम सिरीयस असणार्‍या धोनीचा रोमँटिक अंदाज, पत्नीसोबत केलं असं काही..... VIDEO VIRAL
m.s.dhoni viral video
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2026 | 9:27 PM

क्रिकेटच्या मैदानावर शांत राहणारा, कॅप्टन कुल एका वेगळ्याचं अंदाजात पाहायला मिळालं. आपल्या पत्नीसोबत त्याने असं काही केलंय की त्याचा थेट व्हिडिओच व्हायरल झाला आहे. पण मैदानाच्या बाहेर असताना धोनीच्या वागण्याचा या रोमँटिक अंदाजाने चाहते भारावून गेले आहेत. थाला असाही असू शकतो, वागू शकतो यावर त्याच्या चाहत्यांचा विश्वास बसतच नाही आहे. काय आहे त्या व्हिडिओत जाणून घ्या

18 ऑक्टोबर रोजी जामनगरमधील रिलायन्स ग्रीन्स येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी मित्रमंडळींसोबत नवरात्री – कार्निव्हलचा आनंद घेतला. या कार्यक्रमात एमएस धोनी आणि साक्षीही सहभागी झाले होते. रंगीबेरंगी रोषणाई, मनोरंजनाचे खेळ, मोठे आकाश पाळणे त्या ठिकाणी त्या व्हिडिओत दिसत आहेत.याच वातावरणात सर्व जण रमले होते. पण या सगळ्यात धोनीच्या खोडकर स्वभावाने लक्ष वेधून घेतले आहे.

Loading...

 

 

 

या कार्निव्हलमधील एका व्हिडिओत धोनी साक्षीला आयस्क्रिम भरवल्यासारखा करतो आणि स्वत:च खावून टाकतो. त्यावरून साक्षी त्याला हलकेच मारते. नवरा- बायकोमधील ही गोड मस्ती पाहून चाहत्यांसाठी हसू आवरेना. मैदानावर गंभीर चेहऱ्याने सामना हाताळणारा धोनी घरी आणि मित्रमंडळीमध्ये कसा सहजपणे वावरतो, थट्टा मस्करी करतो हे या व्हिडिओतून दिसलं आणि त्याच्या याच अंदाजाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. यामुळे चाहत्यांमध्ये हशा पिकला आहे.

 

हा व्हिडिओ रात्री दोन वाजता शूट करण्यात आल्याची माहिती आहे. एवढ्या उशीराही फक्त धोनीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुडुंब गर्दी केलेली दिसत आहे. क्रिकेटच्या मैदानात तर सर्वांनाच धोनीला पाहायला आवडते पण त्याचा हा साक्षी सोबतचा मस्तीखोर आणि रोमँटिक अंदाजही सर्वांना आवडला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us