Mumbai Local : लोकलमध्ये विनातिकीट प्रवास, TC ने पकडताच तरुणाने….मुंबईत अजब घटना, पाहा VIDEO VIRAL

एका तरूणाने तिकीट काढले नाही,म्हणून TC ने त्याला पकडले पण या पठ्ठ्याने TC ची नजर चुकवत थेट रूळांवर उडी मारली.मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Mumbai Local : लोकलमध्ये विनातिकीट प्रवास, TC ने पकडताच तरुणाने....मुंबईत अजब घटना, पाहा VIDEO VIRAL
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2026 | 7:15 PM

मुंबई लोकलमध्ये रोज हजारो लोक प्रवास करतात. कुणाला ऑफिसला जाण्याची घाई, तर कोणाल कॉलेज गाठायचं असतं, तर कोणी गर्दीतून वाट काढत घरी जाण्याच्या तयारीत असतं. या सगळ्या गडबडीत अर्ध्या पेक्षा जास्त लोक तिकिट काढण्याचे विसरलेले असते किंवा मुद्दाम तिकीट काढतही नाही. असाच एक तिकीट न काढणारा तरूण टीसीच्या हाती लागला होता. पण त्याने अशी काही करामत केली की ती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. मुंबई लोकलमधील हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार हा तरूण विनातिकीट प्रवास करत होता. त्यामुळे त्याला टीसीने पकडले होते. टीसी त्याला पकडून ऑफिसमध्ये नेत होता. पण तितक्यात तरूणाने TC चा डोळा चुकवत तेथून पळ काढला. पळता पळता हा पठ्ठ्या थेट रेल्वे रूळांवर उतरला आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर चढला. हे सगळं इतक्या झटपट घडलं की TC ला त्याला थांबण्याची संधीही मिळाली नाही. हा व्हिडिओ एका प्रवाशाने त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

Loading...

 

 

 

10 ते 15 रूपयांचे तिकीट पण त्या माणसाच्या अशा कृत्याने काहीतरी भयंकर घडलं असतं. रूळ क्रॉस करताना समोरून अचानक एखादी ट्रेन आली असती किंवा तो रूळात अडकून पडला असता.त्यामुळे 10 – 15 रूपयांच्या त्या तिकीटासाठी आपले जीव टांगणीला लावू नका. विनातिकीट प्रवास करताना पकडलं गेलं तर 500 रूपयांपर्यंत दंड भरावा लागतो. त्यामुळे ते पैसे वाचवण्याच्या नादात हा तरूण थेट रूळांवर उतरला.

खरं तर मुंबई लोकलमध्ये रोजची गर्दी, धावपळ आणि वेळेची घाई असतेच. पण त्यात तिकीट काढण्यासारखी छोटी गोष्ट टाळून स्वत: चा जीव धोक्यात घालणे कितपत योग्य ? तिकीट काढले नसेल आणि पकडले गेलाच तर दंड भरा. कारण 500 रूपयांच नुकसान भरून काढता येईल, पण जीवाला काही झालं तर त्याची भरपाई कशी करणार

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us