मुंबईचा वडा पाव इंटरनॅशनल झाला, अरेरे…पण सॅंडविचच्या यादीत नाव गेले

| Updated on: Mar 11, 2024 | 4:50 PM

वडा पाव म्हटले की तोंडाला पाणी सुटते. झणझणीत चटणी बरोबर गरमागरम वडा पाव खाल्ला की मुंबईकरांचा आत्माच जणू तृप्त होतो. परंतू आता हा वडा पाव इंटरनॅशनल लेव्हलला गेला आहे. मुंबईची ओळख असलेल्या वडापावची जगप्रसिध्द फूड एण्ड ट्रॅव्हल गाईड्स 'टेस्ट एटलस'च्या टॉप-50 बेस्ट सॅंडविचच्या लिस्टमध्ये नोंद घेतली आहे.

मुंबईचा वडा पाव इंटरनॅशनल झाला, अरेरे...पण सॅंडविचच्या यादीत नाव गेले
Vada pav named best sandwiches in the world
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 11 मार्च 2024 : मुंबईचा वडा पाव एकदम आता सातासमुद्रापार जात प्रसिद्ध झाला आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर पासून सगळे वडापावचे दिवाने आहेत. वडापाव आवडत नाही असा मुंबईकर विराळा. केवळ मुंबईतच नाहीत तर देशातील अनेक शहरात वडापाव प्रसिध्द पावला आहे. या वडापावाचा डंका आता जगभर पोहचला आहे. कढईतून गरमागरम काढलेल्या वड्याला सुखी चटणी पावाला लावून खाण्याचा आनंद काही औरच. परंतू या वड्याला जागतिक ओळख मिळाली आहे. प्रसिद्ध फूड एण्ड ट्रॅव्हल गाईड्स टेस्ट एटलसच्या ( taste Atlas list ) टॉप-50 बेस्ट सॅंडविचच्या लिस्टमध्ये सामील करण्यात आले आहे.

येथे पाहा इंस्टाग्राम पोस्ट –

टेस्ट एटलसने अलिकडेच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर जगातील सर्वोत्कृष्ट 50 सॅंडविचची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात 19 व्या क्रमांकावर भारतातील प्रसिध्द वडापावला संधी मिळाली आहे. दादर येथील एका अशोक वैद्य यांनी 1960-70 मध्ये सर्वप्रथम गिरणी कामगारांसाठी वडापावची गाडी सुरु केल्याचे म्हटले जाते. आज हा वडापाव आता स्ट्रीट फूड ते फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत पोहचला आहे.

वडा की सॅंडविच ?

मुंबईतील दादर येथील कृष्णा वडा सर्वात आधी प्रसिद्ध होता. त्यानंतर किर्ती कॉलेजचा वडा पाव आणि सीएसएमटी स्टेशन जवळील आराम वडापाव, फोर्टच्या सीटीओजवळ मिळणारा वडापाव, ठाणे स्टेशन येथील कुंजविहारचा वडा पाव अशा अनेक वडापावची चव वेगवेगळी आहे. नागपूरला तर वडा पावला आलू बोंडा असे देखील म्हणतात. मुंबईच्या या झणझणीत वडा पावला आता जागतिक स्तरावर सॅंडविचचा दर्जा मिळाल्याने खरे तर वडा पाव प्रेमी नाराज झाले असतील. वडा पाव कुठे सॅंडविच कुठे असा प्रश्न त्यांच्या मनात आला असेल.