Viral Video : आजारी नवऱ्याला स्ट्रेचवरून एकटीनच ओढलं; वृद्ध महिलेचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले

सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यामुळे नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. वृद्ध महिला आपल्या पतीला एकट्यानेच स्ट्रेचरवरून ओढत नेत आहे. त्या वृद्ध महिलेचे या वयातही आपल्या पतीसाठी असलेले प्रेम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Viral Video : आजारी नवऱ्याला स्ट्रेचवरून एकटीनच ओढलं; वृद्ध महिलेचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले
viral video
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 23, 2026 | 4:24 PM

गुजरातमधील एक रूग्णालयातून समोर आलेला वृद्ध दांपत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यात एक वृद्ध महिला आपल्या आजारी पतील स्ट्रेचरवरून स्वत:च ओढत नेताना दिसत आहे. या घटनेचा कोणीतरी व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे.नवऱ्याला रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी धडपडणाऱ्या या महिलेचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनेकजण भाऊक झाले.

 

Loading...

आजारी पतीला उपचार मिळावे म्हणून वृद्ध महिलेची धडपड

व्हायरल व्हिडिओमध्य वृद्ध महिला रूग्णालयाच्या परिसरात स्ट्रेचर ओढताना दिसत आहे. त्या स्ट्रेचरवर तिचा आजारी नवरा झोपलेला दिसत आहे. तिच्या नवऱ्याला वेळेवर उपचार मिळावा म्हणून ती स्वत: स्ट्रेचर ओढून हॉस्पीटमध्ये नेत आहे. तीही वृद्ध असल्याने तिच्याने तो स्ट्रेचर ढकलला जात नाही आहे. पण पतीला उपचार मिळावे म्हणून ती धडपडताना दिसत आहे. पण अशा परिस्थितीत रूग्णालयातील कर्मचारी किंवा इतर कोणची मदत मिळाली होती का? याबाबत व्हिडिओतून स्पष्टता मिळालेली नाही.

 

 

 

व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांची मन हळहळली आहेत. अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आयुष्याच्या या टप्प्यावरही पतीची काळजी घेण्यासाठी ती करत असलेली धडपडीमुळे अनेकांचे डोळे भरून आले. तर काहींनाी या दृश्यातून पती- पत्नीमधील नात्याची ताकद दिसत असल्याची म्हटले आहे.

वृद्ध महिलेचा हा व्हिडिओ केवळ भावनिक प्रसंग म्हणून पाहण्यापलीकडे, रूग्णालयातील मदतव्यवस्थेकडे लक्ष वेधणारा आहे. आपल्या जोडीदाराला त्रास होत असताना त्याला मदत करण्यासाठी ती महिला प्रयत्न करत असल्याचं दृश्य अनेकांच्या मनाला भिडलं. त्याच वेळी अशा प्रसंगात रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आवश्यत मदत सहज उपलब्ध व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us