Pakistan Viral Video : पाकिस्तानात नवरात्रीचा जल्लोष! मंदिरात भाविकांच्या रांगा, गरब्याची धमाल….व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले

पाकिस्तानातील नवरात्री साजरी करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानाे व्हायरल होत आहे, त्यामुळे काही भारतीयांना याचे आश्चर्य वाटत आहे. कमेंट्स सेक्शनमध्ये भाविकांच्या कमेंट्स सर्वांच लक्ष वेधून घेत आहेत. जाणून घेऊयात पाकीस्तानातील नवरात्री आणि त्या व्हिडिओविषयी

Pakistan Viral Video : पाकिस्तानात नवरात्रीचा जल्लोष! मंदिरात भाविकांच्या रांगा, गरब्याची धमाल....व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले
pakistan viral video
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 14, 2026 | 3:32 PM

नवरात्र म्हटलं की सजलेली देवींची मंदिर, भाविकांच्या लांबच लांब रांगा, घरात- मंडळात देवीची स्थापना, बसलेले घट आणि रात्री उधळेले गरब्याचे रंग, नऊ दिवस संपूर्ण भारत नऊ रंगात आणि ढंगात रंगलेला असतो. आता हे भारतात दिसणं काही नव नाही पण हेच चित्र जर पाकिस्तानात पाहायला मिळालं तर ? तिथल्याही देवीच्या मंदिरात भाविकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. तरूणाई गरब्यावर थिरकताना दिसते आहे. पाकीस्तानातील हा व्हायरल होणारा गरब्याचा व्हि़डिओ तुम्ही पाहिलाय का?

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मातेचे छान सजवलेलं मंदिर दिसतंय आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी जमली आहे. भक्त माताराणीच्या मूर्तीवर फुलं आणि चुनरी अर्पण करताना दिसतात. मंदिरात पुजा सुरू आहे तर परिसराता भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. नवरात्रीच्या उत्सवासाठी मोठ्या संख्येने लोक जमलेले दिसत आहेत. हा सगळा माहोल पाहून आपाण पाकिस्तानात आहोत कि भारतात हेच कळतं नाही. हा व्हिडिओ पाकिस्तानातील मुंजी गल्हियुन या महिला व्लॉगरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

Loading...

 

 

 

 

आता तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल तर पाकिस्तान तर इस्लामिक समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. मग नवरात्री कोण साजर करतं?तर पाकिस्तानातही काही प्रमाणात हिंदु समुदाय राहतो. त्यामुळे तिथे सुद्धा गणपती, नवरात्री, दिवाळी यांसारखे हिंदू सण मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात.याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतात आणि भारतीय लोकांना त्याचा अभिमानही वाटतो.

या व्हिडिओवर सोशल मिडिया वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने टोमणा मारत भारताची हवा लागली वाटतं अशी मिश्किल कमेंट केली आहे, तर काही नेटकऱ्यांनी हा तर पाकिस्तान वाटतच नाही मिनी भारत वाटतोय अशी कमेंट केली आहे. तर एका यूजरने पाकिस्तानातही हिंदू समाज राहतो त्यामुळे आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही असे देखील म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us