रावण जळतोय की लोकांना जाळतोय? रावणातून रॉकेट्स सुटताच मैदानात उडाली धांदल, VIDEO VIRAL

दसऱ्याच्या दिवशी रामलिला पाहायची आणि रावणाचे दहन करायचे असा कार्यक्रम दरवर्षी ठरलेला असतो. पण यावर्षी रावण दहन पाहायला गेलेल्या लोकांसोबत असे काही घडलंय की रावण जळतोय कि आपल्याला जाळतोय असा प्रश्न पडला.

रावण जळतोय की लोकांना जाळतोय? रावणातून रॉकेट्स सुटताच मैदानात उडाली धांदल, VIDEO VIRAL
ravan dahan in delhi
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 21, 2026 | 6:03 PM

उत्तर भारतात रावण दहन करण्याची प्रथा आहे. दसऱ्याच्या दिवशी रामलिला पाहायची आणि रावणाचे दहन करायचे असा कार्यक्रम दरवर्षी ठरलेला असतो. पण यावर्षी रावण दहन पाहायला गेलेल्या लोकांसोबत असे काही घडलंय की रावण जळतोय कि आपल्याला जाळतोय असा प्रश्न पडला. रावणाला जळण्यासाठी त्यात फटाके लावण्यात आले होते. त्यामुळे जसा रावण जळाला तसे त्यातील रॉकेट्स उडू लागले. मग काय रावण दहन बघायला आलेले लोक स्वत:च त्या फटाक्यांच्या भीतीने सैरवैर पळू लागले.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दसऱ्याचा उत्सव, मैदानात मोठा रावण आणि त्याला जळताना पाहण्यासाठी जमलेली गर्दी… सगळं काही अगदी ठरल्याप्रमाणे सुरू होतं. लोक आरामात उभे राहून रावण दहनाची वाट पाहत होते. पण रावणा जसा जळू लागला तसा संपूर्ण गेमच पलटला.

Loading...

अचानक रावणाच्या पुतळ्यातून फटाके आणि रॉकेट सुटू लागले. रॉकेट्सनी थेट लोकांनाच लक्ष केलं.समोर भलामोठा जळणारा रावण, मागे बघ्यांची गर्दी आणि त्यातून सुटणारे रॉकेट्स साधारण असे ते दृश्य. लोकांना करावं तरी काय असा प्रश्न पडला,जिथे जागा मिळेल तिथे लोकांनी पळ काढायला सुरूवात केली. रावण राहिला बाजूला इथे लोकांनचीच पळापळ.

 

 

 

 

 

सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मज्जा

हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. रावणाच्या या प्रकाराला लोकांनी ‘काऊंटर अटॅक म्हटलंय , तर काहींनी दरवर्षी मला जाळता यावर्षी थांबा मी तुम्हाला जाळतो, मग बघा कसं वाटतंय. तर काही यूजर्सनी याची तुलना चित्रपटातील कॉमेडी सीन्सशी केलं आहे.

खरं सांगायचं तर हा प्रकार जरी हास्यास्पद वाटत असला तितकाच धोकादायकही आहे. जर त्या रॉकेट्स मधून सुटणारी आग आणखी वाढली असती तर काहीतरी भयानक प्रसंग घडण्याची शक्यता होती

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us