Viral Video : उंदीर- बेडूक सोडला, सापाने चक्क गिळलं असं काही की जीवावर बेतलं, प्राण वाचवण्यासाठी…पाहा काय घडलं?

अमेरिकेतील एका सापाच्या शरीरात तब्बल तीन गोल्फ बॉल अडकले होते. पशुवैद्यांनी सापाला सेडेशन देऊन कोणतीही शस्त्रक्रिया न करता हे बॉल सुरक्षितपणे बाहेर काढले.

Viral Video :  उंदीर- बेडूक सोडला, सापाने चक्क गिळलं असं काही की जीवावर बेतलं, प्राण वाचवण्यासाठी...पाहा काय घडलं?
viral video snake
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 27, 2026 | 7:58 PM

सापाने काय गिळलं तर आपण फारतर उंदीर, बेडूक किंवा एखादा छोटा प्राणी म्हणू… पण या सापाने जे गिळलंय ते ऐकून तुम्हीही म्हणाल अरे बाबा, पोट आहे की कचऱ्याची पिशवी? या सापाच्या पोटात चक्क १ ,२ नव्हे तर अनेक गोल्फ बॉल्स सापडले.आता हे बॉल त्याने कसे गिळले हा प्रश्न डॉक्टरांनाही पडला आहे. शेवटी सापाला उपचारासाठी नेण्यात आलं आणि त्याच्या पोटातून हे गोल्फ बॉल बाहेर काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार हा साप अन्नाच्या शोधात फिरत असताना गोल्फ कोर्स किंवा अशाच परिसरात पोहोचला होता. तिथे पडलेले पांढरे गोल्फ बॉल्स त्याला अंड्यासारखे वाटले आणि त्याने ते एकापाठोपाठ एक गिळले. मात्र हे बॉल पचणार नसल्याने सापाच्या पोटातच अडकून राहिले.

पोटं फुगलं आणि हालत झाली गंभीर

गोल्फ बॉल पोटात गेल्यावर सापाचं पोट मोठ्या प्रमाणात फुगलं. त्यामुळे त्याला हालचाल करण्यासोबतच श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर त्याला पशुवैद्यांकडे उपचारासाठी नेण्यात आलं.

 

 


 

 

 

 

सापाने जवळपास त्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा मोठा गोल्फ बॉल गिळण्याने सापाला जीवाला धोका निर्माण होण्याची शक्याता होती. डॉक्टरांनी सापाला पोटाच्या वरच्या दिशेने हाताने मालिश करून बॉल हळूहळू गळ्याच्या दिशेने आणले. त्यानंतर एकएक करून तोंडातून बॉल बाहेर काढण्यात यश आले.

व्हिडिओ व्हायरल होताच…

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी डॉक्टरांचे आभार मानलेत. तर काही लोकांनी सापाविषयी सहानूभूती दाखवली आहे.  हा व्हिडिओ एका सोशल मीडिया पेज वरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ कोणत्या देशातील आहे हे अद्याप समजलेले नाही.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us