अब्जाधीश आहे ही तरूणी, तरीही एक दु:ख सलतंय; म्हणाली – पैसाच सगळं काही नाही…

| Updated on: Apr 26, 2024 | 10:05 AM

Isabella Barrett : माणसाकडे कितीही पैसा असू दे, त्याने आनंद विकत घेता येत नाही , असं म्हटलं जातं. पण तरीही बरंच लोकं असं मानतात की हातात पैसा असेल तर काहीच अशक्य नाही. पण तुम्ही या अब्जाधीश तरूणीबद्दल ऐकाल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की समजेल, ती म्हणजे - पैसा हा सर्वस्व नाही.

अब्जाधीश आहे ही तरूणी, तरीही एक दु:ख सलतंय; म्हणाली - पैसाच सगळं काही नाही...
Follow us on

पैसा असेल तर सगळं काही होऊ शकतं, सगळंच शक्य आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर कदाचित तुम्ही चुकीचा विचार करत आहात. सोशल मीडियावर सध्या एका अब्जाधीश मुलीची कहाणी व्हायरल होत आहे, जी जाणून घेतल्यानंतर तुमचा विचारही बदलू शकतो. हातात चिक्कार पैसा असलेल्या या मुलीकडे आज त्या सर्व गोष्टी आहेत, ज्याचं बरेच लोक स्वप्न पाहतात. पण अब्जाधीश झाल्यानंतरही या मुलीला मनात एक दुःख सलतंय. तिचे जे जवळचे मित्र होते ते आता तिच्यासोबत नाही, याच गोष्टीचं तिला दुःख आहे. त्यामुळे फक्त पैसाच (असणे) हे सर्वस्व नाही, असं तिचं म्हणणं आहे.

ही गोष्ट आहे अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री इसाबेला बॅरेट हिची. वयाच्या 10 व्या वर्षाच्या आतच ती करोडपती बनली . ‘टॉडलर्स अँड टियारस’ या हिट टीव्ही शोमधून बालकलाकार म्हणून तिने करिअरला सुरुवात केली. आज ती अनेक मोठ्या कंपन्यांसाठी मॉडेलिंग करते. एवढंच नव्हे तर ग्लिट्झी गर्ल नावाची तिची स्वतःची ज्वेलरी कंपनी आहे. एवढ्या लहान वयातच इसाबेला ही अमेरिकेतील सर्वात तरुण स्वयं-निर्मित कोट्यधीशांपैकी एक आहे. पण या वयात इतकं साध्य करूनही इतका पैसा कमावूनही तिला एका गोष्टीची खंत आहे.

पैसा म्हणजे सर्वस्व नाही

द सनच्या रिपोर्टनुसार, लोक त्यांच्या स्वप्नात जे जीवन जगतात तेच इसाबेला जगत आहे. मात्र मेहनतीने तिने हे यश मिळवले आहे. मात्र, एवढ्या संपत्तीमुळे खरा मित्र मिळणे कठीण झाले आहे, असे तिचे मत आहे. माझे जे मित्र होते, त्यांना माझ्या लाईफस्टाइलचा हेवा वाटू लागला आणि ते माझ्यापासून दुरावले.

असं असलं तरी आता इसाबेला हिला एक खरा मित्र मिळाला आहे.गेविन असं त्याचं नाव आहे. गेविन आणि मी एकमेकांची ताकद आहोत. मी न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये शो करत होतो तेव्हा गेविन माझ्यासोबत होता. आमचं नातं चांगलं आहे, याबद्दल मी स्वत:ला सुदैवी मानते, असं इसाबेलने नमूद केलं.