Tiger Shroff : रील नहीं, रियल हीरो…फायरिंगमधून थोडक्यात वाचला टायगर श्रॉफ आणि सोशल मीडियावर सुरु झाला नवा ट्रेंड

टायगर श्रॉफ एका भयंकर हल्ल्यातून वाचला. सुरूवातीला त्याच्या गाडीवर हल्ला झाल्याच्या आणि त्याला दुखापत झाल्याच्या बातम्या सगळीकडे पसरल्या पण या हल्ल्यात टायगरचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला. सुदैवाने टायगर या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. त्यामुळे चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या सगळ्या घटनेमुळे सोशल मीडियावर टायगर अभी जिंदा है हा ट्रेंड सुरू झाला.

Tiger Shroff : रील नहीं, रियल हीरो…फायरिंगमधून थोडक्यात वाचला टायगर श्रॉफ आणि सोशल मीडियावर सुरु झाला नवा ट्रेंड
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 19, 2026 | 6:33 PM

चित्रपटात टायगर श्रॉफला धडाधड अॅक्शन करताना आपण अनेकदा पाहिलंय. पण यावेळी त्याच्या आयुष्यात असा प्रसंग घडला की चाहत्यांची धाकधूकच वाढली. मुंबईच्या जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. अचानक आलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. सुदैवने टायगर या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. त्यानंतर सोशल मीडियावप चाहत्यांनी सुटकेचा नि: श्वास सोडला आणि ‘टायगर जिंदा है’ म्हणत त्याच्यासाठी पोस्टचा पाऊस पाडला.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी टायगर श्रॉफच्या जुहू परिसरात जात असताना त्याच्या गाडीवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्लेखोरांनी गाडीच्या दिशेने अनेक गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेत टायगरला गोळी लागली नाही. मात्र टायगरचा ड्रायव्हर फिरदौस जखमी झाला. त्याला उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आलं. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Loading...

 

ही बातमी समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला.पण आपल्या आवडत्या अभिनेत्याला काही झालं नाही, हे कळल्यावर अनेकांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. काही जणांनी त्याच्या सुरक्षेसाठी प्रार्थनाही केली. तर काहींनी त्याच्याच चित्रपटातील ‘टायगर जिंदा है’ याची आठवण करून दिली आणि हेच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

 


 

 

टायगर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. ड्रायव्हरला गोळी लागताच त्याने जराही वेळ फुकट न घालवता थेट स्वत: गाडी चालवत त्याला हॉस्पीटल मध्ये अॅडमीट केले. यावरून टायगरचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. तर कोणी हा अनुभव भीतीदायक असल्याचे सांगत देवाचे आभार मानले आहेत. तर कोणी आज ‘टायगर जिंदा है’ या हा फेमस डायलॉग समजला असं सांगतंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us