एवढुशा पोराने धाकट्या भावाचा वाचवला जीव, व्हिडीओ व्हायरल, प्रचंड कौतुक!
आपल्या धाकट्या भावाला धोक्यापासून वाचवण्यासाठी मोठ्या भावाची सतर्कता आणि शौर्य या व्हिडिओत दिसत आहे, ज्याचे सोशल मीडियावर अनेकांकडून कौतुक केले जात आहे.

मोठी भावंडे नेहमीच त्यांच्या लहान भावंडांसाठी दुसरे पालक असतात. हा व्हिडीओ प्रचंड फेमस झालाय. यात मोठ्या भावाने असं काही केलंय की लहान भावाचा जीव वाचलाय. तीन वर्षांच्या मुलाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यात फक्त 5 सेकंदात या मुलाने लहान भावाचा जीव वाचवलाय. त्याने पाहिले की त्याच्या धाकट्या भावाने तोंडात एक छोटेसे खेळणे घातले आहे. हे खेळणं जर त्याने गिळलं असतं तर ते घशात अडकून त्याचा गुदमरून मृत्यू झाला असता. पण मोठ्या भावाने वेळीच हे होताना रोखलंय.
आपल्या धाकट्या भावाला धोक्यापासून वाचवण्यासाठी मोठ्या भावाची सतर्कता आणि शौर्य या व्हिडिओत दिसत आहे, ज्याचे सोशल मीडियावर अनेकांकडून कौतुक केले जात आहे. क्लिपची सुरुवात एका मजकुराने होते, ज्यात लिहिले आहे की, “जेव्हा तुमचे तीन वर्षांचे मूल मोठ्या भावाची जबाबदारी स्वीकारते.” अचानक मोठ्या भावाला लहान भावाच्या तोंडात एक खेळणं दिसलं आणि त्याने वेळीच ते बाहेर काढलं. त्याने आपल्या धाकट्या भावाला पकडून तोंड उघडले आणि लहानशी खेळणी बाहेर काढली.
मुलाने केलेला हे कृत्य पाहून लोक खूप कौतुक करतायत. टिकटॉकवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ ट्विटरवर पुन्हा शेअर झाल्यानंतर हजारो लोकांचे लक्ष वेधून घेत होता. सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो व्हायरल होत आहे. एका ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘बाळाने लहान भावाची काळजी घेतली.’ या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या.