Video: डोक्यावर पुष्पवृष्टी अन् डोळ्यात पाणी, पोलीस अधिकाऱ्याच्या निरोपाचा असा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल!

व्हिडिओमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांसह तिथं उपस्थित लोकांचे डोळे पाणावले आहेत. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांना या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. एवढेच नाही तर लोक या पोलिस अधिकाऱ्याचे कौतुकही करत आहेत.

Video: डोक्यावर पुष्पवृष्टी अन् डोळ्यात पाणी,  पोलीस अधिकाऱ्याच्या निरोपाचा असा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल!
कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याचा निरोप समारंभ
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 2:49 PM

तुम्ही सर्वांनी ही म्हण ऐकली असेल की – जो काम करतो त्याला त्याच फळ मिळते आणि म्हणूनच लोक चांगल्या कामांसाठीच ओळखले जातात. अनेकदा तुम्ही सर्वांनी सोशल मीडियावर निवृत्ती किंवा निरोपाशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहिले असतील. आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक पोलिस कर्मचारी निरोप घेताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याची बदली झाली आहे, त्याच्या निरोपाच्या वेळी उपस्थित लोक त्याच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत. दोघांनी मिळून त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छाही दिल्या. ( Viral Video of Police Officer spectacular farewell with flowers heart touching video goes viral)

व्हिडिओमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांसह तिथं उपस्थित लोकांचे डोळे पाणावले आहेत. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांना या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. एवढेच नाही तर लोक या पोलिस अधिकाऱ्याचे कौतुकही करत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला कसा निरोप दिला जात आहे ते तुम्ही पाहू शकता. लोक त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत आहेत. सर्वांचे डोळे ओले आहेत आणि मिठी मारून निरोप घेत आहेत. इतकंच नाही तर खुद्द पोलीस कर्मचारीही खूप भावूक दिसत होते. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहा-

पोलिस कर्मचाऱ्याचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही ‘@upcopvishwendra’ नावाच्या खात्यावर सर्व व्हिडिओ पाहू शकता. पोलीस अधिकाऱ्याच्या निरोपाचा हा व्हिडीओ शेअर करत पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा एखादा पोलीस परिसरात अशी छाप सोडतो, तेव्हा मनाला धीर येतो, कारण आम्ही राज्यकर्ते नव्हे, सेवक आहोत, जय हिंद.’ हजारो लाईक्स आणि कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

व्हिडिओ पाहून अनेक सोशल मीडिया यूजर्स क्षणभर भावूक होत आहेत. आता व्हिडिओवर लोकांच्या कमेंट्सबद्दल बोलत असताना एका यूजरने कमेंट करताना लिहिले, ‘असा पोलिस सर्वत्र असावा’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘पैसे सगळे घेतात, पण इतकं प्रेम आणि आदर एखाद्या दुर्मिळ व्यक्तीलाच मिळतो. तिसऱ्या यूजरनं लिहिलं,’ आज आपल्या देशाला, राज्याला अशा पोलिसांची गरज आहे जे सर्वसामान्यांच्या मनावर राज्य करू शकतील’, अजून एकाने लिहिले, ‘चांगल्या आणि प्रामाणिक लोकांचाच आदर केला जातो.

हेही वाचा:

Video: साडेचार कोटीच्या ‘लॅम्बॉर्गिनी’च्या बोनटवर ठेऊन कार्तिक आर्यनकडून स्ट्रीट फूडचा आस्वाद, कार्तिकच्या साधेपणाचं सर्वत्र कौतुक

Video: तरुणीची ‘मगर’मिठी, त्यानंतर काय झालं पाहा, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ!