Viral : Reels बनवा महिन्याला 95 लाख कमवा, नोकरीसाठी कंपनीत असा करा अप्लाय
एका मोठ्या कंपनीने रिल स्टारसाठी एक मोठी सुवर्ण संधी जाहीर केली आहे. त्यानुसार क्रिऐट्रर्सना रिल शूट करून त्या कंपनीला पाठवायचे आहेत. या रिल्स प्रमाणे प्रत्येक महिन्याला उमेदवारांना 95 लाख रूपये देण्यात येणार आहेत.

दिवसभर रिल्स पाहत बसलात किंवा सतत मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत असाल, तर घरचे म्हणतच असतात काय दिवसभर फोनमध्ये गुसलेले असतात. पण जरा थांबा राव, कारण आता रिल्स बनवून लाखो रूपये कमावण्याची संधी समोर आली आहे. प्रसिद्ध उद्योगपती रिचर्डज ब्रॅन्सन यांच्या व्हर्जिन ग्रुपने ‘ हेड ऑफ यस’ नावाची एक खास संधी जाहीर केली आहे. यात निवड झालेल्या व्यक्तीला जगभर फिरायचं, वेगवेगळे अनुभव घ्यायचे आणि त्यांचे व्हिडिओ बनवून लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. यासाठी अमेरिकेतली उमेदवारांना 1 लाख डॉलर, तर ब्रिटनमधील उमेदवारांना 75 हजार पौंड मोबदला दिला जाणार आहे. भारतीय चलनात ही रक्कम साधारण 95 लाख रूपयांच्या आसपास होते.
या पदाचं नाव ‘हेड ऑफ यस’ आहे. व्हर्जिन ग्रुपच्या व्हर्जिन रेड कार्यक्रमाशी ही संधी जोडलेली आहे. निवड झालेल्या व्यक्तीला वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करायचा, भन्नाट अनुभव घ्यायचे आणि ते छोटे व्हिडिओ, फोटो व गोष्टिंच्या माध्यमातून दाखवायचे आहेत.म्हणजे फक्त फिरून फोटो काढायचे नाहीत, तर त्या अनुभवांची मजेशीर पद्धतीने गोष्ट पण सांगायची आहे.
ही संधी जानेवारी 2027 पासून सुरू होणार असून तिचा कालावधी सहा महिने असेल. विशेष म्हणजे यासाठी लाखो फॉलोअर्स असण्याची अट नाही. फक्त तुम्हाला उत्तम रित्या स्टोरी टेलिंग करता आलं पाहिजे.
अर्ज कसा करायचा?
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आपल्या आयुष्यातील असा एखादा खरा अनुभव सांगणारा छोटा व्हिडिओ बनवायचा आहे. ज्यामध्ये त्यांनी आव्हानात्मक व्हिडिओ बनवायचा आहे. हा व्हिडिओ बनवताना इन्स्टाग्राम, युट्युब, टिकटॉकवर टाकताना #Headofyears हा हॅशटॅग वापरायचा आहे आणि @Virgin या अकाउंटला टॅग करायचे आहे. अर्जाची अंतिम मुदत 20 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत पाठवायचा आहे. आता विचार करा, ज्या रिल्स बनवण्यासाठी घरचे ओरडतात, त्याच रील्समधूम लाखोंची कमाई करण्याची संधी मिळाली तर! मात्र या नोकरीसाठी योग्य उमेदवार निवडला जाणार आहे.