Viral Video : ‘जल्दी बोल, पनवेल निकलना है’ म्हणताच प्रोफेसर संतापले; स्टेजवर विद्यार्थ्याची कॉलर पकडली

अहमदाबादच्या Nirma Universityमध्ये Technofora 2026दरम्यान एका विद्यार्थ्याने ‘जल्दी बोल, कल सुबह Panvel निकलना है’ हा प्रसिद्ध फिल्मी डायलॉग म्हटल्याचा दावा आहे. त्यानंतर प्रोफेसरने विद्यार्थ्याला स्टेजवर बोलावलं आणि व्हायरल व्हिडिओमध्ये त्याची कॉलर पकडताना दिसत आहेत.

Viral Video : ‘जल्दी बोल, पनवेल निकलना है’ म्हणताच प्रोफेसर संतापले; स्टेजवर विद्यार्थ्याची कॉलर पकडली
gujrati university viral video
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 25, 2026 | 9:30 PM

कॉलेजचा कार्यक्रम सगळी मुल समोर बसलेली…. स्टेजवर प्रोफेसर माईकवर बोलत आहेत. इथपर्यंत सगळ ठीक होत. पण मग विद्यार्थी अस काही बोलला की प्रोफेसराने स्टेजवर बोलवत, सगळ्यांसमोर थेट त्याची कॉलरच पकडली. मस्करीत बोलेल एका वाक्यामुळे संपूर्ण कॉलेजचे वातावरण चांगलेच तापले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता या घटनेची जोरदार चर्चा देखील सुरू आहे.

अहमदाबादच्या नर्मदा विद्यापीठातील घटना

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गुजरातमधील अहमदाबादच्या नर्मदा विद्यापीठात घडली आहे. Technofors 2026 या कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. हा तीन दिवसांचा कार्यक्रम 18 ते 20 संप्टेबर दरम्यान विद्यापीठाच्या तंत्रज्ञान संस्थेतील विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता.

कार्यक्रमादरम्यान स्टेजवर प्रोफेसर बोलत असताना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका विद्यार्थ्याने गोलमाल ३ या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग मारला ” जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है” असं म्हटलं. त्यानंतर स्टेजवर असलेल्या प्रोफेसराचा पारा इतका चढली कि त्यांनी थेट त्या मुलाला स्टेजवर बोलावले. अन् कॉलर धरली.

स्टेजवर बोलावलं अन् पकडली कॉलर

व्हायरल व्हिडिओमध्ये प्रोफेसर विद्यार्थाची कॉलर पकडताना दिसत आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्याला कठोर शब्दात ओरडल्याचं देखील व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. तस शिक्षा करण्याचा किंवा कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिल्याचा व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे.

एका मजेशीर कमेंटपासून सूरू झालेला हा प्रकार आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. विद्यार्थ्याची कमेंट योग्य होती की अयोग्य, आणि त्यावर प्रोफेसरची प्रतिक्रिया किती योग्य होती? यावर नेटकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या कमेंट्स पाहायला मिळत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us