थकून आलेल्या नवऱ्याला ताट वाढलं… जेवत असताना अचानक मासा जिवंत झाला अन्…

| Updated on: Jan 15, 2024 | 5:40 PM

थकून आलेल्या नवऱ्याला बायकोने जेवणात वाढला जिवंत मासा. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

थकून आलेल्या नवऱ्याला ताट वाढलं... जेवत असताना अचानक मासा जिवंत झाला अन्...
Follow us on

व्हायरल व्हिडीओ : नवरा-बायकोमधील नाते हे प्रेम आणि आदर यावर आधारित असते. नवरा ऑफिसमधून आल्यावर नवऱ्याला पाणी किंवा जेवण देणं. जेवण सुंदर झालं असेल तर अनेक पती बायकोचं कौतुक देखील करतात. पण सध्या याच्या अलट घडताना बघायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पत्नी नवऱ्याला जेवणासाठी ग्रेव्हीसह जिवंत मासे देतेय. हे पाहून नवऱ्याला मोठा धक्का बसतो.

सध्या सोशल मीडियावर या दोघांचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर @kaushik_borah_01 या युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव देखील करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ शेअर केला जातोय. 9 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून

पाहा व्हिडीओ 

नेमकं व्हिडीओमध्ये आहे तरी काय?

बायकोने नवऱ्याला जेवण वाढल्यानंतर नवऱ्याने ताटातला मासा उचलताच तो फडफडतो आणि नवऱ्याच्या हातून निसटतो. ही बघून नवरा-बायको दोघे आश्चर्यचकित होतात. त्याच वेळी नवऱ्याच्या चेहऱ्यावर राग दिसतो. त्यानंतर तो जेवणाचे ताट दूर ढकलतो.