बायकोने नवऱ्याचं नशीब बदलल, 900 रूपयांत नवऱ्याला बनवलं कोट्यधीश

नवऱ्याने त्याच्या बायकोला 900 रूपयांचे लॉटरीचे तिकीट आणून दिले. लॉटरीचे तिकिट नवऱ्याने बायकोला गिफ्ट म्हणून दिले होते. बायकोने हे तिकिट स्क्रॅच करताच त्याला करोडोंचा जॅकपॉट लागला आहे. आयुष्यभराची गरीबी एका लॉटरीने कायमची संपवली

बायकोने नवऱ्याचं नशीब बदलल, 900 रूपयांत नवऱ्याला बनवलं कोट्यधीश
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 18, 2026 | 2:16 PM

नवऱ्याने बायकोला भेट म्हणून काय द्याव तर कोणी साडी देतं, कोणी दागिना, तर कोणी आवडीची वस्तू घेऊन येतं. पण एका नवऱ्याने बायकोला अशी भेट दिली आहे की त्यामुळे तीच संपूर्ण आयूष्यच बददलं आहे. नवऱ्याने साधं 900 रूपयांचे लॉटरीची दोन तिकीटं आणली आणि पत्नीच्या हातात दिली. आता ही भेट पाहून बायको काय म्हणाली असेल हे माहित नाही पण तिने तिकीट स्क्रॅच करून पाहिलं आणि जे समोर आलं ते पाहून दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. कारण या एका तिकिटावर ती कोटींची मालकीण झाली आहे. तिचे गरीबीचे दिवसच पालटले आहेत.

ही घटना अमेरिकेतली व्हर्जिनिया राज्यातल्या बेडफोर्ड काऊंटीमध्ये घडली. फॉरेस्ट शहरातील वॉटरलिक रोडवर असलेल्या व्किव – ई – फूड्स या दुकानातून महिलेच्या पतीने गोल्ड 7s या लॉटरीची दोन तिकिट खरेदी केली. या दोन्ही तिकिटांसाठी त्याने साधारण 850 ते 900 रूपये खर्च केले.

Loading...

घरी आल्यावर त्याने ही तिकिटं पत्नीला भेट दिली. पत्नीने तिकिटावरचा भाग खरवडून पहिलं. आणि एका तिकिटावर बक्षीस लागल्यावर समोर आलं. लॉटरी जिंकल्यानंतर तिने व्हर्जिनिया लॉटरीच्या अधिकाऱ्यांना कॉल केला.त्या अधिकाऱ्यांनील तेही काही हजार किंवा लाखांचं नाही, तर तब्बल 5 लाख 77 हजार 777 डॉलर! भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे 5 कोटी रूपये जिंकल्याचं महिलेला सांगितलं. 900 रूपयांच्या एका लॉटरीने संपूर्ण जोडप्याचं आयुष्यच बदललं.

एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर या महिलेने आपल्या पुढच्या योजनांबद्दलही सांगितलं आहे. या पैशांमधील काही रक्कम प्रवासासाठी वापरण्याचा तिचा विचार आहे. म्हणजे नवऱ्याने सहजपणे दिलेली छोटीशी भेट आता या दोघांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारी आठवण बनली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us