Viral Video : रील बनवण्यासाठी महिलेचा कहर! ट्रेनच्या इंजिनला पदर बांधून थेट रेल्वे ट्रॅकवर डान्स

महिलेने साडीचा पदर ट्रेनच्या इंजिनला बांधून रेल्वे ट्रॅकवर डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्रेन उभी असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असले तरी रेल्वे परिसरात अशा प्रकारे रील शूट करण्यावर सुरक्षेचे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Viral Video : रील बनवण्यासाठी महिलेचा कहर! ट्रेनच्या इंजिनला पदर बांधून थेट रेल्वे ट्रॅकवर डान्स
viral video
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 4:42 PM

रील बनवण्यासाठी लोक काय करतील याचा खरंच नेम नाही! कुणी रस्त्यावर डान्स करतं, कुणी चालत्या गाडीवर चढून व्हिडिओ बनवतं, तर कुणी रिल व्हायरल होण्यासाठी चांगल्या ऐतिहासिक ठिकाणी वेडेवाकडा डान्स करत रिल व्हायरल करतं. पण सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये महिलेने कहरच केलाय. या महिलेने थेट ट्रेनलाच आपला डान्स पार्टनर बनवला आहे. या महिलेने चक्क साडीचा पदर ट्रेनच्या इंजिनला बांधला आणि रेल्वे ट्रॅकवर उभ राहून सरळ नाचायलाच सुरूवात केली. तिचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैरान झाले आहेत तर काहींना रिल पाहून हसूहसूच आवरतं नाहीये.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला साडी आणि गॉगल घातलेली दिसत आहे. तिच्या मागे रेल्वेचा एक ट्रेन उभी आहे. महिला आपल्या साडीचा पदर इंजिनला बांधते आणि त्यानंतर सरळ डान्सचं सुरू करते. रिल शूट करताना ती वेगवेगळे हावभाव आणि डान्स करताना दिसत आहे.

Loading...

बॉलिवूड स्टा्ईल डान्स करण्याचा महिलेचा प्रयत्न

महिलेचा हा अंदाज ओळखीचा वाटत असेलच. बरोबर या महिलेने ट्रेनला पदर बांधून बॉलिवूडचं रिक्रेशन किंवा कॉपी केल्यासारख वाटत आहे. पण हा कुठल्याच चित्रपटाचा भाग नसून सोशल मिडिया रिलसाठी महिलेने हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये ट्रेन थांबलेली असली तरी अशा पद्धतीने शूट करण्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हा व्हिडिओ एक्स वरील एका अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. १ ऑक्टोबरला हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ कुठला आहे याची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे व्हिडिओच्या आधारावर ठिकाण सांगणं अयोग्य ठरेल.

 

 

 

 

नेटकरी हैरान

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही महिलानी फिल्मी अंदाजात या रिलवर कमेंट्स केल्या आहेत तर काहींनी काय बावळट बाई आहे अस म्हणून जोरदार टिकाही केल्या आहेत. तर काही यूजर्सनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना टॅग करून या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

रिल महत्त्वाचा कि जीव?

सोशल मिडियावर व्हायरल होण्यासाठी नवीन काहीतरी करण्याचा ट्रेंड वाढला आहे. पण रेल्वे ट्रॅक किंवा ट्रेनच्या आसपास व्हिडिओ शूट करताना सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या व्हिडिओमध्ये ट्रेन उभी असल्याचं दिसत असलं तरी काही रेल्वे परिसरात अशा प्रकारे रिल बनवणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे काही सेंकंदाच्या व्हिडिओसाठी अशा ठिकाणी धोका पत्करण्याची गरज आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us